प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांना कुसुमाग्रज जीवन गौरव पुरस्कार जाहीर
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 21 फेब्रुवारी 2024
β⇔त्र्यंबकेश्वर,दि.21(प्रतिनिधी:प्रा.समाधान गांगुर्डे) :- येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पुंडलिक पवार यांची नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघच्या वतीने दिला जाणारा कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव पुरस्कारसाठी निवड झाली आहे. शैक्षणिक क्षेत्र व मराठी भाषेबरोबरच विविध कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय हिताच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असलेल्या नवनवीन उपक्रमांसाठी हा पुरस्कार दिला जातो.
प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक तथा नाविन्यपूर्ण शैक्षणिक राबवत असलेल्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांची संघ निवड समितीने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना विशेष जीवनगौरव हा पुरस्कार कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी कुसुमाग्रज नगरी, शिरवाडे वणी, ता.निफाड, जि.नाशिक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल समाजाच्या सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510