Breaking
ब्रेकिंग

β : निफाड :⇒विद्यार्थिनींचा सैनिकांसाठी  “एक धागा कृतज्ञतेचा ” रक्षाबंधन  उपक्रम – ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )

β : निफाड :⇒ विद्यार्थिनींचा सैनिकांसाठी  "एक धागा कृतज्ञतेचा " रक्षाबंधन  उपक्रम - ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )

018491

विद्यार्थिनींचा सैनिकांसाठी  “एक धागा कृतज्ञतेचा ” रक्षाबंधन  उपक्रम

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि ३० ऑगस्ट २०२३ 

β⇒ निफाड ( सायखेडा ) , ता ३० ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ):- देश सेवेसाठी दुर सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी ‘एक धागा कृतज्ञतेचा’ हा  रक्षाबंधन उपक्रम जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयाने आर्टिलरी सेंटर नाशिक येथे राबविण्यात  आला . यावेळी  आर्टिलरी सेंटर नाशिक चे प्रमुख ब्रिगेडियर ए. रागेश यांच्या संकल्पनेतून साकारलेला व विद्यालयाचे प्राचार्य  नवनाथ निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थिनी आर्टिलरी सेंटर नाशिक येथे सैनिकांना राखी बांधण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 

                              विद्यार्थी व सैनिक यांच्या चेहऱ्यावरील आनंद या उपक्रमाद्वारे द्विगुणित झाला यावेळी विद्यार्थ्यांनी आर्टिलरी म्युझियम भेट दिली प्रत्यक्ष रणांगणावर वापरले जाणारे युद्ध साहित्य याचा जवळून अनुभव घेतला . प्रत्यक्ष सैनिकांच्या जीवनात असणारे खडतर प्रशिक्षण त्याचे जवळून अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. विद्यार्थिनींनी सैनिकांची संवाद साधला. यावेळी , एनसीसी प्रमुख सोमनाथ शिंदे गाईडप्रमुख विजया मोरे, राजेंद्र कदम उपस्थित होते.

दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ.  भागवत महाले,  मो. ८२०८१८०५१०

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!