β : सुरगाणा :⇒ या निसर्ग भूमीचे मूळ मालक व निवासी तुम्हीच आहात – उत्तम कांबळे – सुप्रसिद्ध लेखक , साहित्यिक व माजी संपादक सकाळ- ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
β : सुरगाणा :⇒ महोत्सव रणभाज्यांचा प्रबोधन विदयालय आंबाठा येथे सपन्न - ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
β :⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा: नाशिक :सोमवार, दि . २८ ऑगस्ट २०२३
β : सुरगाणा :⇒ ता .२८ ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ) : – या निसर्गभूमीचे मूळ मालक व निवासी तुम्हीच आहात – उत्तम कांबळे –सुप्रसिद्ध लेखक , साहित्यिक व माजी संपादक सकाळ यांनी गौण वन उपज आधारित आदिवासी महिला उद्योजकता विकास प्रकल्प व प्रबोधन विद्यालय, आंबाठा, ता. सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महोत्सव रानभाज्यांचा २०२३’ ह्या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना प्रतिपादन केले .महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ, नाशिक संचलित , ता. सुरगाणा प्रबोधन विद्यालय आंबाठा येथे सदर कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी संपादक सकाळ वृत्तपत्र , सुप्रसिद्ध लेखक व साहित्यिक – उत्तम कांबळे , उमेश वाघ, सहाय्यक वन संरक्षक- वेलकर वन परिक्षेत्र अधिकारी सुरगाणा, कवर – वन परिक्षेत्र अधिकारी, बार्हे आणि त्यांच्या अधीनस्त असलेले सुरगाणा, उंबरठाण व बार्हे अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यक्रम अध्यक्ष- फा.जोएल नोरोन्हा, संचालक, महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ आणि त्यांच्या अधीनस्त असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग , सि. थेरेसा वसावा, मुख्यध्यापिका, प्रबोधन विद्यालय, आंबाठा व शिक्षक व इतर कर्मचारी, फा. लंसी दिकृझ -माजी प्राचार्य संत जेविअस महाविद्यालय अहमदाबाद, अविनाश जोंधळे- वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख, एम जे एम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, करंजाळी पेठ, सुरेश चौधरी -शिक्षण विस्तार अधिकारी कळवण, अनिल भोर, मंडळ कृषी अधिकारी, सुरगाणा, श्री .चौरे, सरपंच आंबाठा, रावसाहेब कसबे- विचार जागर फौंडेशन, जितेश पगारे व सहाय्यक व अभिव्यक्ती मिडिया फोर डेवलपमेंट, रतन चौधरी, श्रीमती जीवली भोये, महिला प्रतिनिधी, रामदास देशमुख, सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते .
सदर कार्यक्रम गौण वन उपज आधारित आदिवासी महिला उदयोजक्ता विकास हा प्रकल्प महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार संधी व परिसरातील जंगल संवर्धन हे उदिष्ट ठेऊन मागच्या दोन वर्षापासुन हा प्रकल्प चालू आहे. हा प्रकल्प सुरगाणा तालुक्यातील डोल्हारे, राशा, खुंटविहीर, गोंदुणे व कुंकूडणे पाच ग्रामपंचायत एकूण एक हजार महिलांसोबत हा प्रकल्प राबवत आहे. प्रकल्प अंतर्गत लघु उदयोग, अल्पखर्चिक शेती, तत्रज्ञान, वृक्षलागवड, फळबाग लागवड, परसबाग असे अनेक उपक्रम महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ राबवत आहे. रानभाज्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनामध्ये ५५ रानभाज्या, १५ तृणधान्य पदार्थ व १० सामुहिक व्यवसाय पदार्थ यांची चव घेता आली. सर्व पदार्थाचे प्रत्यक्षात भाग, त्याची पाककृती व चव सर्वाना घेता आली. त्याचप्रमाणे एकूण ८० प्रकारचे बियाणे याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली व त्यानंतर प्रास्ताविक किर्ती कापडी, नेलफेड प्रकल्प विषयी माहिती कुंता भोये, रान भाज्यांचे पारंपारिक ज्ञान याविषयी यमुना झिरवाळ, पारंपारिक गीत मीराबाई व ग्रुप, आरोग्य प्रकल्प माहिती कुशावर्ता पवार, रानभाजी जतन व संवर्धन याविषयी अविनाश जोंधळे, तृणधान्य याविषयी अनिल भोर, विद्यार्थी मनोगत खुशाली व ओम व सर्व मान्यवरांनी मार्ग दर्शन व मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आदिवासी गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले.
यावेळी गौरव कुलकर्णी, विद्यकीय अधिकारी, उंबरठाण, सीताराम भोये, राशा सरपंच, रामदास भूजाड, वैदू कुकुडणे, कासम बाबा शेवरे, वैदू राशा, तुकाराम राऊत, वैदू बोरचोंड, भास्कर गावित, वैदू डोल्हारे, जीवलू पाडवी, वैदू डोल्हारे, महाराष्ट प्रबोधन सेवा मंडळ व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग यांनी उपस्थिती दर्शवली, कार्यक्रमास ६०० हून अधिक महिलानी उपस्थिती दर्शवली.
:⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा: मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले, मो ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)