β : नाशिक:⇔गांजाची अवैद्य वाहतूक करणारा पिकअप जप्त ,साधुसह तिघेजण पोलिसांच्या ताब्यात-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक:⇔गांजाची अवैद्य वाहतूक करणारा पिकअप जप्त ,साधुसह तिघेजण पोलिसांच्या ताब्यात-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
गांजाची अवैद्य वाहतूक करणारा पिकअप जप्त ,साधुसह तिघेजण पोलिसांच्या ताब्यात
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 5 मे 2024
β⇔नाशिक, दि.5 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंड येथे पिक-अप जीप मधून 86 हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा घेऊन जात असताना एका भोंदू बाबासह तीन जणांना वावी पोलिसांनी ताब्यात घेतले.या कारवाहीमध्ये संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील कथित साधुसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेचे सविस्तर वृत्त असे की चास नांदूर शिंगोटे मार्गे गांजाची अवैद्य वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना मिळाली होती, त्यानुसार वावी पोलिसांनी नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंडमध्ये वाहनांची तपासणी सुरू केली असता, रस्त्यापासून आत काही अंतरावर एक पांढऱ्या रंगाची पिकअप क्रमांक एम एच 17 सी व्ही 15 87 ही संशयित गाडी उभी दिसली. सदर गाडीची तेथे जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या गोण्यामध्ये गांजा मिळून आला. पिकअपमध्ये बसलेला कथित साधू योगी पवन बाबा (39) पुजारी. राहणार पुष्कर (राजस्थान) हल्ली रा. स्वामी समर्थ केंद्र जवळ चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जीप चालक गोरख गोपीनाथ भादेकर (41) राहणार चिंचोली गुरव , शरद रामनाथ शेळके 43 राहणार नांदूर शिंगोटे या तिघांना ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांचे जवळून तीन गोण्यामध्ये भरलेला साडेचार किलोग्रॅम वजनाचा 86 हजार रुपये किमतीचा गांजा, तेरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, सात लाख रुपये किमतीची पिकअप जीप, असा सात लाख 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदेश पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर,पारस वाघमोडे,हवालदार हेमंत कदम,साहेबराव बलसाने,किरण पवार,महिला पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )