β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : येडशी : रविवार : दि 08 डिसेंबर 2024
β⇒ येडशी, ( प्रतिनिधी : सुभान शेख ) – धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान येथे कै. पोपट शेळके यांच्या स्मरणार्थ आणि धाराशिव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते व सुनील शेळके यांच्या वतीने दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केसरी कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी चांदीची गदा आणि रोख 21,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
सलग दोन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पार पडला. अंतिम लढत बीड तालुक्यातील पाटोदा येथील बाळासाहेब भैरवाल आणि अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडचे पृथ्वीराज वनवे यांच्यात झाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत बाळासाहेब भैरवाल यांनी विजय मिळवत चांदीची गदा आणि रोख रक्कम जिंकली.
स्पर्धेनंतर बाळासाहेब भैरवाल यांचा चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांतून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमास धाराशिव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, आमदार कैलास पाटील यांचे बंधू अतिश पाटील, येडशी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गजानन नलावडे, श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत सस्ते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विभाग प्रमुख विनोद पवार, विष्णु पवार, दीपक धोंगडे, बाळासाहेब आवारे, सुंदर जवळगे, गोविंद घाडगे, राजाभाऊ देवकते, बालाजी नागटिळक, लक्ष्मण क्षिरसागर, देविदास शेळके, हेमंत कचरे, शरद सावंत आणि कुस्ती प्रशिक्षक आबा शेळके यांचे विशेष योगदान लाभले.
श्री क्षेत्र रामलिंग देवस्थानच्या वतीने सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि या कार्यक्रमाला आलेल्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०