बिटको महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘ बजेट ‘ या विषयावर एक दिवशीय चर्चासत्र संपन्न…
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 10 फेब्रुवारी 2024
β⇔ नशिकरोड,दि.10 (प्रतिनिधी:संजय परमसागर):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील चांडक बिटको चांडक महाविद्यालयात दि.१० फेब्रुवारी रोजी *अर्थशास्त्र पदव्युत्तर (एम ए )विभागातर्फे “Budget-बजेट २०२3-२४’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ अनिल सावळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत अत्यंत सोप्या भाषेत बजेट आणि त्यातील तरतुदी अगदी मुद्देसूद आणि प्रभावीपणे सांगितले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे आणि वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. कृष्णा शहाणे आणि प्रा.डॉ. भागवत गाडेकर यांच्या समवेत प्रा.डॉ. सुभाष भोसले, डॉ. विजय सुकटे , प्रा.डॉ. भास्कर आव्हाड, प्रा.डॉ. वैशाली जोशी, नेहा विश्वकर्मा, अनुराग रत्नपारखी, डॉ. मनीष पवार, शेळके सर, राऊत मॅडम, दीपांजली नायडू, डॉ. बागूल सर आणि डॉ. तारू सर व अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बी. एस. आव्हाड यांनी केले तर आभार डॉ.अनुराग रत्नपारखी यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510