Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)

β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)

018499

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणारअविनाश शिरसाठ: समन्वयक, निवडणूक अभियान

β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)
β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 23 सप्टेंबर  2024

β⇔नाशिक,दि.23 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):-विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आदर्श जतन करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे. स्वतः मतदान नोंदणी करून आपलं मतदान कार्ड प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपला मतदान अधिकाराने राजकीय सत्ता चांगल्या व्यक्तीच्या हाती सोपवली जाईल आणि भारत देश महासत्ता होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही,” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे व वक्ते अविनाश शिरसाठ (समन्वयक, निवडणूक अभियान) यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे राज्यशास्त्र विभागांतर्गत ‘नवीन मतदार नोंदणी जाणीव व जागृती अभियान 2024” या  उपक्रमांतर्गत “भारतीय लोकशाहीतील निवडणुका आणि  मतदारांची भूमिका “या विषयावर आयोजित व्याख्यान देतांना ते  बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे अविनाश शिरसाठ- समन्वयक, निवडणूक अभियान नाशिक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भागवत महाले, सकाळ सत्रप्रमुख डॉ. राजेश झनकर, सकाळ सत्रप्रमुख प्रा. श्रीमती नीता पुणतांबेकर, प्रा. श्रीमती श्वेताली सोनवणे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा हस्ते सरस्वती देवीचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची  सुरुवात करण्यात आली, त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा पुस्तक व गुलाब पुष्प देवून  सत्कार करण्यात आला.

β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)
β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)

   प्रमुख पाहुणे व वक्ते अविनाश शिरसाठ पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले, की मतदानाचा हक्क लोकशाही शासन व्यवस्थेमध्येच प्राप्त होत असतो. हुकमशाही, राजेशाही शासन व्यवस्थेमध्ये कोणत्याही नागरिकाला मतदानात करण्याचा अधिकार प्राप्त होत नसतो. म्हणून  मूलभूत अधिकाराचा वापर करण्याचा   फक्त लोकशाही शासन व्यवस्थेमध्येच आपल्याला हक्क मिळाले आहेत. त्याचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी मतदान कार्ड व मतदान यादीत नाव नोंदणी करणे प्रत्येक तरुणांचं कर्तव्य आहे.  त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा मतदान कार्ड काढून देणे आवश्यक आहे. हे राष्ट्रीय कार्य आपण सर्वांनी सांभाळून एक राष्ट्राला नवीन दिशा राष्ट्राला नवी आशा देण्याचे काम आपण करणार आहोत. गावागावी जनतेला मतदानाचा अधिकार व कर्तव्ये  जाणीव व जागृती करणे हे तरुण विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय कार्याला हातभार लावला गेला पाहिजे, राष्ट्रीय निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी बोगस मतदान रोखण्यासाठी मतदान ओळखपत्र हे असलं पाहिजे त्यामुळे पारदर्शक निवडणुका होतील, असे त्यांनी सांगितले. टी.एन. शेषन यांच्या काळामध्ये मतदान (ओळखपत्र) कार्डला  शेषन कार्ड म्हणून ओळखलं जात होते.  आज आपण त्याला मतदान कार्ड असं या नावाने ओळखत असतो म्हणून त्याचं महत्त्व अशा प्रकारचे राष्ट्रीय कार्य करण्यास आपली सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांनी बोलताना सांगितले.

β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)
β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)

             कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य  डॉ. दिलीप पवार म्हणाले, की प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपलं मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजावला पाहिजे. देशातील अतिउच्च सन्मानाचा मतदान करण्याचा हक्क  १८ वर्ष  पूर्ण प्रत्येक भारतीय नागरिकांना मिळाला आहे. म्हणून आपले राष्ट्रीय कर्तव्य, सांभाळण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. तरुण भारतीय भावी पिढीने या मतदानाचे महत्त्व लक्षात घेता एक चळवळ म्हणून देशाच्या उभारणीसाठी मतदार जाणीव व जागृती अशा उपक्रमातून समाजाला प्रबोधन करण्याचे काम करणार आवश्यक आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व सुशिक्षित तरुणांची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या घरातीलच सदस्यांबरोबरच आसपास परिसरातील सदस्य, नागरिकांना सुद्धा मतदान करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. त्यांना  मतदान कार्ड काढण्यास मदत केली गेली पाहिजे, असे याप्रसंगी सांगितले.

β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)
β : नाशिक :⇔विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व राष्ट्रीय कर्तव्य बजावले, तर देश महासत्ता होणार-अविनाश शिरसाठ:समन्वयक,निवडणूक अभियान-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. भागवत महाले म्हणाले, की विद्यार्थ्यांनी आपले 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपलं राष्ट्रीय कार्य म्हणून फॉर्म नंबर सहा भरून आपलं मतदान यादीत नाव येण्यासाठी व  मतदान ओळखपत्र (मतदान कार्ड) मिळवण्यासाठी हा फॉर्म भरणे अत्यावश्यक आहे. मतदानाचा अधिकार हा राष्ट्रीय मूलभूत सर्वोच्च अधिकार आहे, त्यामुळे देशातील नागरिकांना आपल्या मर्जीचे  सरकार बनवण्यासाठी दिलेला एक अनमोल ठेवा आहे. म्हणून मतदान नोंदणीसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला जाऊन आपण मतदान कार्ड काढण्यासाठी फॉर्म नंबर 6 फॉर्म भरून ऑनलाइन मतदार नोंदणी करू शकतो. त्याचबरोबर “वोटर  हेल्पलाइन” या मोबाईल ॲपवर  देखील नोंदणी करू शकता. त्याच बरोबर आपल्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करू शकतो. असे याप्रसंगी त्यांनी सांगितलं. त्यानंतर पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून दिला.
           याप्रसंगी प्रमुख अतिथी अविनाश शिरसाठ- समन्वयक निवडणूक अभियान नाशिक, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. (प्रो.) डॉ. दिलीप पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.भागवत महाले, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मनोज मगर, आय क्यूए सी समन्वयक – डॉ. शरद कांबळे, सकाळ सत्र प्रमुख डॉ. राजेश झनकर, सकाळ सत्र प्रमुख प्रा. श्रीमती नीता पुणतांबेकर, डॉ. श्रीमती जया शिंदे, प्रा. श्रीमती योगिनी पगारे, प्रा. श्रीमती श्वेताली सोनवणे, प्रा. श्रीमती अर्चना धारराव, प्रा. समाधान गांगुर्डे प्रा. उत्तम सांगळे, प्रा. मनोहर जोपळे, प्रा. श्रीमती सोनाली इचाळे, डॉ. श्रीमती योगिता जाधव, कु. जयश्री माळवे, कु.धनश्री माळवे  आदीसह बहुसंख्येने विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भागवत महाले यांनी केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती श्वेताली सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती योगिनी पगारे यांनी केले.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!