वणी अंगणवाडीत “महात्मा ज्योतिराव फुले” यांची पुण्यतिथी साजरी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि 28 नोव्हेंबर 2024
β⇔ वणी (नाशिक), ता.28 (प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):-आज वणी येथील अंगणवाडी कोळीवाडा 1 आणि खांडे गल्लीमध्ये आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी गावातील विविध मान्यवर आणि नागरिकांनी फुलेंच्या विचारधारेचे स्मरण करून त्यांचे समाजाला दिलेले योगदान अधोरेखित केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात, अंगणवाडी सेविका सौ. नंदाताई गांगुर्डे, सौ. अनिताताई जाधव, मदतनीस सौ. हैसा पवार, हिराबाई माळेकर, मिराबाई चित्तोडे, तसेच मोठ्या संख्येने माता, बालक, आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विविध मान्यवरांनी फुलेंच्या कार्यावर प्रकाश टाकत समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी दिलेले योगदान अधोरेखित केले. त्यांच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानावर आणि महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षावर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महात्मा फुले यांनी शोषित, पीडित, वंचित घटकांसाठी दिलेला संदेश आणि त्यांच्या विचारधारेने देशाच्या समाजव्यवस्थेत घडवलेले बदल हे आजही प्रेरणादायी आहेत. उपस्थितांनी त्यांच्या विचारधारेचा अंगिकार करून समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्याचा संदेश दिला.या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महिलांचा आणि तरुणांचा सक्रिय सहभाग हा या कार्यक्रमाची महत्त्वाची वैशिष्ट्ये ठरला.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त वणीतील अंगणवाडीत साजरा करण्यात आलेला हा कार्यक्रम एकता, समता, आणि शिक्षणाचा संदेश देणारा ठरला. उपस्थितांच्या विचारमंथनातून फुलेंच्या विचारांचे मूळ महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वीपणे झाला.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510