शेतकरी , शेतमजुर व कामगार यांची लाँगमार्चला सुरवात रात्री बाऱ्हे गावी मुक्कामी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 24 फेब्रुवारी 2024
β⇔सुरगाणा ग्रामीण ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ) :-आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 सकाळ बाऱ्हे हया विभागातिल लोक इतर गावातून लोक हया मोर्च्यात सामिल झाले आहेत.त्या गावातून रवाना होऊन त्याचे दुपारचे जेवन ननाशी जवळील भुरुक देव हया ठिकाणी आहे. आणी संध्याकाळचा मुक्काम हा गोळशी फाटा येथे आहे. कम्युनिस्ट पार्टीचं लाल वादळ विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
शेतकरी , शेतमजुर व कामगार यांची लाँगमार्चला सुरवात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व किसानसभेच्या पुढाकाराने लाँगमार्चला काल पेठ येथून सुरुवात झाली असून दुसरा दिवस आहे.
माकप आणि किसान सभेच्या पुढाकाराने शेतकरी , शेतमजूर ,कामगार पलाटदारक यांचा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये पेठ तालुक्यातील आडगाव, उंबरपाडा येथील महिला गुलबाबाई चौधरी यांना चक्कर येऊन पडली असून माजी उपसभापती महेश टोपले यांनी महिलेस गोळशी फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले दरम्यान तिची तब्येत स्थिर असून या लॉंग मार्चकडे सरकारने आता तरी लक्ष द्यावे आणि मागण्या मान्य कराव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे हा मोर्चा 26 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510