





बिटको महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 27 फेब्रुवारी 2024
β⇔नाशिकरोड,दि.27(प्रतिनिधी: संजय परमसागर):-” मराठी भाषा ही ज्ञानभाषा असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कवी कुसुमाग्रजांनी मोलाचे योगदान दिले. मराठी भाषेला प्रतिभा संपन्न वारसा, सर्वांग सुंदर व मधुर गोडवा, साहित्य संस्कृती व परंपरा आहे. मराठी भाषेची थोरवी काव्यात्मक रुपात मांडण्याचा संत ज्ञानेश्वरांनी व गोविंदाग्रजांनी, कोल्हटकरांनी केला. मराठी भाषेचा अभिमान बाळगा आपल्या बोलीतून,व्यवहारातून मराठी भाषेत संवाद साधावा, मराठी भाषेची अस्मिता, स्वाभिमान जपा व संवर्धन करा, ” असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या समवेत कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एम. लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.के. एम.लोखंडे यांनी केले.
β : नाशिकरोड :⇔बिटको महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा-(प्रतिनिधी:संजय परमसागर)
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे माय भू तुझे मराठी भाषा गौरव गीत, ‘ मराठीचा अभिमान ‘ एकपात्री अभिनय, बहिर्जी नाईक यांचे तुंबडी लोकगीत, अभंग लावणी, कोळीगीत, ‘ जावई पाहुणे ‘ लोकप्रबोधनात्मक नाटक, पिंगळा महाद्वारी, प्रेम वेडी राधा हे भावगीत व भक्तीगीते असे विद्यार्थ्यांचे मराठी भाषा लोककला व संस्कृती असे विविध गुणदर्शन सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उत्तम करमाळकर यांनी केले तर आभार प्रा. आर. बी.बागुल यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. विशाल माने, डॉ. संतोष पगार, डॉ. सुधाकर बोरसे, सौ. उषा पाटील, डॉ. शरद नागरे, डॉ. संभाजी शिंदे, सौ. वृषाली उगले, सौ. मीना गिरडकर, सौ. सुचिता पुंडलिक, प्रा. ज्योती पेखळे यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.