Breaking
ब्रेकिंग

β : नाशिक:⇒श्री. विघ्नहर्ता गणेश मंदिर ट्रस्टच्या काव्य स्पर्धेत काशिनाथ महाजन प्रथम – ( प्रतिनिधी : प्रा.डॉ. कृष्णा शहाणे )

β : नाशिक:⇒श्री. विघ्नहर्ता गणेश मंदिर ट्रस्टच्या काव्य स्पर्धेत काशिनाथ महाजन प्रथम - ( प्रतिनिधी : प्रा.डॉ. कृष्णा शहाणे )

018491

श्री. विघ्नहर्ता गणेश मंदिर ट्रस्टच्या काव्य स्पर्धेत काशिनाथ महाजन प्रथम

β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 22 सप्टेंबर 2023
β⇒ नाशिक,  ता. 22, ( प्रतिनिधी : प्रा.डॉ. कृष्णा शहाणे ) :- श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर ट्रस्ट मॉडेल कॉलनी, जेलरोड नाशिक रोड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले जागर कवितेचा हे खुले कवी संमेलन नुकतेच संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर हे होते,  तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. कृष्णा शहाणे, विघ्नहर्ता गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहन सुळे, प्रा. आशा पाटील, वंदना नागवंशी आदी उपस्थित होते.       
               यावेळी राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शुभांगी पाटील, तर अनिता गोडसे, कल्पना गडाख यांना अंगीकृत क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल तसेच गुणवंत कामगार विलास गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेत तील विजेते पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम – काशिनाथ महाजन, द्वितीय – दत्तात्रय दाणी , तृतीय – सौ सुनीता बिडवे, उत्तेजनार्थ – योगेश कापडणीस स्पर्धेतील विजेत्यांना कवी रवींद्र मालुंजकर, प्रा.डॉ. कृष्णा शहाणे, अनिता गोडसे, प्रा. आशा पाटील, विघ्नहर गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहन सुळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
                 काव्यवाचन स्पर्धेत अशोक पाटील, विक्रम गांगुर्डे, रामचन्द्र शिंदे, सुधीर कुलकर्णी, सुदाम सातभाई, प्रा. रामदास पोरजे, माणिकराव गोडसे, नंदकिशोर ठोंबरे, अलका दराडे, विशाल टर्ले, गणेश पवार, अजय चव्हाण राजेन्द्र वाघ, भगवान गांगुर्डे, कविता कासार, प्रज्ञा गोपाळे, नंदा शेळके, हंसिका सोनवणे, समर्थ जाधव, बी. टी. जाधव आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
                 कार्यक्रम प्रसंगी शुभांगी पाटील, अनिता गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांनी काम पाहिले. चित्रा मुकुंद ढिकले यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन केले.
कवी रवींद्र मालुंजकर, प्रा.डॉ. कृष्णा शहाणे, प्रा आशा पाटील, वंदना नागवंशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गुणवंत कामगार विलास गोडसे, प्रशांत कापसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब खरोटे, संजय मोरुसकर, शरद मोरे, दत्तात्रय तिवारी, सुरेश भोसले, राजेंद्र कलार, राजू कारणकार, नानासाहेब भंडारी, राजेंद्र चाळीसगावकर, अमोल गुंजाळ, चौधरी, जोशी, सुनील पठारे, बाळकृष्ण शेलार, दर्शन भामरे, भारती सुळे ,सुनंदा बर्वे ,नंदा शेळके, जाधव ताई ,आचार्य ताई , सुवर्णा चव्हाणके, नीता चव्हाण, शिंदे ताई, शेलार ताई ,जाधव मावशी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०  
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!