





“लातूर – येडशी – बार्शी” राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्यास सुरूवात; नागरिकात समाधान : ‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’च्या बातमीचा दणका

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 01 ऑक्टोबर 2024
β⇔येडशी(धाराशिव),दि,01(प्रतिनिधी : सुभान शेख):-येडशी येथील राष्ट्रीय महामार्ग “लातूर – येडशी – बार्शी “ यामहामार्गावर अनेक महिन्यांपासून पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशी व वाहनधारकांचे खूप हाल होत आहेत. सदर महामार्गावर दररोज 200 ते 250 बसेस व अन्य वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे खूपच रस्ता खरब झाला आहे. लातूर अंतर्गत असलेल्या धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा महामार्ग आहे. या भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाश्यांना व वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. रात्री-अपरात्री पेट्रोलिंग करताना पोलिसांना देखील खड्ड्यांमुळे अडचणी येत आहेत. पोलिस निरीक्षक मारुती शेळके यांनी देखील या समस्याबाबत नेते , ग्रामस्थ व पत्रकारांना खंत व्यक्त केली होती.

सदर या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर नाशिकमधून प्रकाशित होणाऱ्या ‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ या यूट्यूब चॅनलच्या संपादक डॉ.भागवत महाले यांनी या रस्त्यावरील धोक्याची बातमी 6 सप्टेंबर रोजी “लातूर – येडशी – बार्शी” महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, या मथळयाने बातमी प्रसिद्ध केली.
रात्री-अपरात्री वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने येडशीचे प्रतिनिधी सुभान शेख यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन सतत पाठपुरावा केला. अखेर, 30 सप्टेंबर रोजी लातूर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहाय्यक उपअभियंता प्रल्हाद कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे वाहनधारकांनी मोठा दिलासा अनुभवला असून, त्यांनी सहाय्यक उपअभियंता प्रल्हाद कोरे, प्रतिनिधी सुभान शेख आणि गुत्तेदारांचे आभार मानले आहेत.
“दिव्य भारत बीएसएम न्यूज” चॅनलचे संपादक डॉ.भागवत महाले यांनी या कामगिरीसाठी ”सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी”आपले चॅनल समर्पित असल्याचे सांगितले. नागरिकांनी कोणत्याही समस्येचा सामना करत असल्यास बातमीच्या माध्यमातून त्यांची समस्या मांडण्यासाठी चॅनलशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )