Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदेश-विदेशनिधन वार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

β : नागपूर:⇔जखमा जुन्याच; परंतु वायनाड सारखे नवीन-नवीन घाव चिंताजनक : रमेश लांजेवार-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार)

β : नागपूर:⇔जखमा जुन्याच; परंतु वायनाड सारखे नवीन-नवीन घाव चिंताजनक : रमेश लांजेवार-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार)

018491

जखमा जुन्याच; परंतु वायनाड सारखे नवीन-नवीन घाव चिंताजनक

β : नागपूर:⇔जखमा जुन्याच; परंतु वायनाड सारखे नवीन-नवीन घाव चिंताजनक : रमेश लांजेवार-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार)
β : नागपूर:⇔जखमा जुन्याच; परंतु वायनाड सारखे नवीन-नवीन घाव चिंताजनक : रमेश लांजेवार-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक बुधवार :: दि. 31 जून  2024

β⇔,नागपूर,दि.31 (प्रतिनिधी : रमेश लांजेवार):- पुण्यातील ३० जुलै २०१४ माळीण दुर्घटनेची व रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी सारख्या अनेक दुःखद व अंगावर शहारे येणाऱ्या घटना पुर्वीही झाल्यात. त्याचीच पुनरावृत्ती आज वायनाडमध्ये निर्माण झाली आहे.तरीही आपण अजूनपर्यंत निसर्गावर होणारे आघात आपण रोखू शकलो किंवा जातीने लक्ष देवू शकलो नाही व पाहिजे त्या प्रमाणात वृक्षलागवड करू शकलो नाही हे मानवजातीचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. याच घटनांची पुनरावृत्ती दिनांक ३० जुलै २०२४ ला पहाटे धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाने मोठा आघात करून गाढ झोपेत असलेल्या गावकऱ्यांवर पुन्हा निसर्ग कोपुन भूस्खलनामुळे केरळमधील वायनाडवर मोठा आघात करत वायनाडमधील चार गावे ढिगाऱ्याखाली दबली व यात १२३ जणांचा मृत्यू झाला तर १२८ जण गंभीर जखमी झालेत तर आताही अनेक ढीगाऱ्याखाली असल्याचे सांगितले जाते ही अत्यंत भयावह व अंगावर शहारे येणारी घटना आहे.वायनाड मधील २२०० जनसंख्या असणारे ४ गाव ४ तासात भूस्खलनाने जमीनदोस्त झाली. केरळमध्ये २०१८ मध्ये कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने भूस्खलनामुळे ४०० लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासुन केरळमध्ये कमी वेळात जास्त पाऊसाचे प्रमाण वाढल्याने केरळमध्ये आकस्मिक आपदाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जास्त पावसामुळे भूस्खलनाचे क्षेत्र ३.४६ टक्क्यांनी वाढले आहे. देशातील २०१५ ते २०२२ पर्यंत ३७८२ भूस्खलन झाले त्यापैकी ५९ टक्के भूस्खलन एकट्या केरळमधील आहे हा अत्यंत चिंतेचा व गंभीर विषय आहे. इर्शाळवाडीची घटना अत्यंत दुःखद आणि अंगावर शहारे येणारी होती.

               दिनांक २० जुलै २०२३ ला कोसळत्या धुव्वाधार पावसात आणि गार वाऱ्यात ४९ कुटुंब गाढ झोपेत होते तेवढ्यात मातीचा मोठा ढिगारा डोंगरावरून घरंगळत खाली आला आणि त्याने अर्धावरून अधिक गाव गिळंकृत केले यात आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला होता. यापुर्वीही अशाच भयावह घटना आपण उघड्या डोळ्यांनी पहिल्यात यावर देशातील राज्य सरकारे व केंद्र सरकार तात्पुरती उपाययोजना करून शांत बसते. परंतु पुन्हा-पुन्हा त्याच त्या दुःख घटना उद्भवतात व नवीन-नवीन जखमा करून जातात यावर केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे वायनाडची भूस्खलनाची ताजी घटना. देशात अजुनही असे अनेक क्षेत्र आहे की त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. पावसाचे तांडव, काळीज चिरणाऱ्या दुर्घटना आणि मृतदेहाचे ढिगारे हे अलीकडे पहाले आहे. महाराष्ट्रात यापूर्वी दासगाव, सावित्री पूल, तळीये, तारिक गार्डन, ईर्शाळवाडीची भयावह घटना या जुन्या जखमा अद्याप भरून निघालेल्या नसतानाच आता निसर्गाने वायनाडवर प्रहार केला व निष्पाप लोकांचा बळी गेला.२६ जुलै २००५ ला दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन या गावात दरडी कोसळून १९४ जणांचा मृत्यू झाला होता, २ऑगस्ट २०१६ला सावित्री नदीवरील पूल कोसळून ४० जणांचा बळी गेला,२५ ऑगस्ट २०२० ला महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून १६ जण मृत्युमुखी पावले, २२ जुलै २०२१ ला पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन दरडीखाली ६ जणांचा मृत्यू झाला,याच दिवशी २२ जुलै २०२१ ला महाड तालुक्यातील तळीये हे गाव डोंगराखाली गडप झाले आणि ८७ लोकांचा जीव गेला आणि आता वायनाडची घटना ह्या सर्व घटना होऊन गेल्या तरीही देशातील राज्यांना जाग का येत नाही? मानवाने जंगल संपदा नष्ट केल्याने पुन्हापुन्हा अशा नैसर्गिक भयावह घटना घडत आहेत.

               त्यामुळेच पुन्हा-पुन्हा जुन्या जखमा ताज्या होतांना दिसतात व वायनाड सारखा जब्बर घाव सहन करावा लागतो हे केरळचे व देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. देशातील किंवा राज्यातील दरड कोसळण्याच्या घटना मुख्यत्वेकरून वृक्षतोडीमुळे होत आहे ही बाब सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, पक्ष-विपक्ष यांना माहित असुन सुद्धा देशातील अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षकटाई सपाट्याने सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते. आज राज्यासह देशात मोठमोठे महामार्ग (हायवे), औद्योगिकीकरण, रस्ते रूंदीकरण, वाढत्या लोकसंख्येमुळे वस्त्यांचे वाढते प्रमाण यामुळे दऱ्याखोऱ्याना मोठे नुकसान होत आहे व धाराशाही होतांना आपण पहातो. ग्लेशिअर वितळले अशा अनेक नवीन-नवीन आपदा निर्माण होत आहे अती पावसामुळे संपूर्ण पाणी समुद्रात जाऊन दिवसेंदिवस समुद्राची पातळी वाढत आहे ही मानवजातीसाठी व पृथ्वीतलावरील जीवजंतूसाठी धोक्याची घंटा आहे. हे सर्व प्रकार लाखो-करोडोच्या संख्येने वृक्षतोड केल्याने होत आहे. त्याचाच परिणाम आज आपल्याला नैसर्गिक आपदाच्या रूपात वायनाडमध्ये पहायला मिळत आहे. निसर्गावर होत असलेल्या अन्यायामुळे दरड कोसळणे, भूस्खलन, अतीपाऊस, अती थंडी, अती उष्णतेच्या रूपात भोगावा लागते आहे. राज्यातच नाही तर देशात अनेक नैसर्गिक आपदा येत असतात. परंतु यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर पुन्हा-पुन्हा त्याची पुनरावृत्ती वायनाडच्या रूपात होतांना आपल्याला दिसते आणि यापुढेही दिसेल सुध्दा. आपण देशाचा विचार केला तर एकट्या २०२२ मध्ये ३८७ नैसर्गिक आपत्ती आल्यात त्यात ३०७०४ लोकांचा मृत्यू झाला.वायनाड सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने वेळोवेळी पाऊले उचलली पाहिजेत. १९०० ते २०२२ पर्यंतची भारतातील नैसर्गिक आपत्तीची आकडेवारी पहाली तर चकीत करणारी आहे या कालावधीत ७६४ नैसर्गिक आपत्ती आल्यात यात ९१ लाख ३५ हजार ५५६ लोकांचा मृत्यू झाला याचा फटका सर्वाना सहन करावा लागला. ह्या सर्व घटना बदलत्या हवामानामुळे होत आहे. कारण भारतातीलच नाही तर जगातील ५० टक्के जंगलसंपदा वृक्ष तोडीमुळे नेस्तनाबूत झाली आहे.

                  यामुळे सध्याच्या परिस्थितीत भारत, चीन, दक्षिण कोरिया, आणि बांगलादेश, पाकिस्तान महापुराच्या विरखळ्यात अडकलेला आहे. तर दुसरीकडे थंड हवामानाच्या युरोपमध्ये उष्णतेचा कहर सुरू आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या काही राज्यांत उष्णतेची लाट आहे तर काही राज्यांना पुराचा तडाखा बसला आहे. ब्रिटनमध्ये नेहमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने ब्रिटन जलमग्न झाले आहे. दूबई कधीच एवढा पाऊस येत तेवढा पाऊस तीथे झाला होता. तापमानातील वाढ आणि हवामानातील बदलांचे फटके जगभरातील बहुतेक देशांना बसायला सुरुवात झाली आहे. कोरड्या प्रदेशात मुसळधार पाऊस,तर पावसाच्या प्रदेशांत दुष्काळ अशी विपरीत परिस्थिती बदलत्या हवामानामुळे जगभर निर्माण होऊ लागली आहे.यामुळे एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे महापुर अशें विचित्र संकट जगावर ओढावल्याचे दिसून येते.हे सर्व संकट मानवाने स्वतःहून ओढावले आहे. त्यामुळे वायनाड सारख्या घटनांची पुन्हा-पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये याकरिता सरकारने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून वेळोवेळी पाऊले उचलली पाहिजेत. तेव्हाच आपल्याला नैसर्गिक आपदाच्या घटनांवर थोडा का होईना अंकुश लावण्यास मदत होईल.नैसर्गिक आपदा रोखण्यासाठी वृक्षतोड ताबडतोब थांबविली पाहिजे व मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून दऱ्याखोऱ्याना पुनर्जीवित केले पाहिजे हिच देशातील राज्य सरकारांकडून कडून अपेक्षा!, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रासह देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे रेड अलर्टवर आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक राज्ये सुध्दा रेड अलर्टवर आहे.कुठे ढगफुटी तर कुठे सतत पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.त्यामुळे सर्वांनीच सावधगिरी बाळगावी आणि आपल्या जीवाची काळजी घ्यावी व प्रशासनाची मदत घ्यावी. कारण देशातील अनेक राज्यांचा पावसाचा धोका अजून पर्यंत टळलेला नाही. सावधान!
      लेखक :
              रमेश कृष्णराव लांजेवार
              (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
                 मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                 ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

©सदर लेखाबाबत  संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.  सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून  त्यांचीच जबाबदारी आहे, 

     

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!