





उंबरदे गावात स्मशानभूमी शेड नसल्याने भरपावसात दोघांवर ताडपत्रीखाली अंत्यविधी
“सुरगाणा तालुक्यात स्मशानभूमी शेड मागणी ”
दिव्य भारत बी एस एम न्यूज : प्रतिनिधी – बोरगाव : लक्ष्मन बागुल
बोरगाव ( ता. सुरगाणा), ता .१२ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ):- सुरगाणा तालुक्यातील पळसन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उंबरदे (प) येथे स्मशानभूमी शेड नसल्याने नुकतेच भरपावसात दोघांवर अंत्यविधी करण्याचा प्रकार घडला. सोनी रामा कनोजे व लक्ष्मण येवाजी चौधरी यांच्यावर ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली . अशा प्रकारची दुसरी घटना तालुक्यातील पिळुकपाडा व साबरदरा येथे घडली होती. उंबरदे येथे स्मशानभूमी शेड बांधण्यात आलेले नसल्याने मयताच्या नातेवाईकांचे अंत्यविधीसाठी पावसामुळे खूपच हाल होत असतात्त .नुकतेच येथीलच सोनी रामा कनोजे व लक्ष्मण येवाजी चौधरी यांचे रविवारी निधन झाले. गावात स्मशानभूमी शेड नसल्याने भरपावसात अंत्यविधी करण्याचा प्रसंग निर्माण झाला . त्यामुळे अंत्यविधीची चिंता नातेवाईकांना लागली होती. शेवटी ताडपत्रीखाली मृत महिला व पुरुषावर नातेवाईकांनी अंत्यविधी पार पाडला. यावेळी उपस्थित प्रत्येकाने शासनावर रोष व्यक्त केला. सुरगाणा तालुक्यात एकूण 61 ग्रामपंचायती असून इतर सर्व गाव पाड्यांची अवस्था साबरदरा व पिळुकपाडा अशीच आहे. निवडणूक आली की लोकप्रतिनिधी गावकरी व पुढा-यांना बरोबर घेत गरीब आदिवासींना विकासकामे करण्याच्या भूलथापा देतात आणि निवडणुकीनंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे अशीच राहते. तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिळूकपाडा येथे 23 सप्टेंबर 2021 मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. यासह वाघधोंड ग्रामपंचायत अंतर्गत साबरदरा येथे 8 जुलै 2022 ला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली होती.
दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले , मोबाइल नंबर : ८२०८१८०५१०
