





पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फ पुण्यश्लोक मातुश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४६व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 29 फेब्रुवारी 2024

β:नाशिक:दि,29(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी):-येथील पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फ पुण्यश्लोक मातुश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४६व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण करण्यात आले. कॉलेजरोड येथील गुरुदक्षिणा सभागृहातील पलाश हॉलमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळया प्रसंगी प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला.

आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सर डॉ.मो. स. गोसावी ह्यांनी स्थापन केलेल्या शिवपार्वती प्रतिष्ठानच्या उपक्रमांचा आढावा घेवून सरांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ विजय गोसावी ह्यांनी उपस्थितांचे स्वागत केले , आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले संर्वांच्या सहकार्यामुळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणे शक्य झाले आहे. संस्कार , प्रेम व आदर समाजात वृध्दींगत झाले पाहिजेत . शिक्षणाला अध्यात्माची जोड असायला पाहिजे असे सांगून त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतूक केले सामाजिक बांधिलकीची जाण असणारे अप्पासाहेब शिक्षण महर्षी होते .
संस्थेचे सचिव कल्पेश गोसावी यांनी सर्व पुरस्कारार्थीच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला.याप्रसंगी प्रकाश पाठक यांनीही मो.स. गोसावी सरांच्या आठवणींना उजाळा देवून प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक केले.यानंतर पुण्यश्लोक सद्गुरु शिव पार्वती अध्यात्मिक पुरस्कार प.पू . डॉ . रामकृष्णदासमहाराज लहावित कर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
कार्यक्रमास गोखले ए्ज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ.आर.पी. देशपांडे ,प्रतिष्ठानचे सचिव कल्पेश गोसावी, अॅड एस.एल. देशपांडे, सुप्रिया पानसे, शैलेश गोसावी , प्रदीप देशपांडे , अक्षय देशपांडे गिरीश नातू डॉ. खंडेलवाल सर्व गोसावी व देशपांडे परिवार उपस्थित होते.यावेळी श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार, वे. मू. वामन पुंडलिक हळबे यांना तर नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार वे. मू .डॉ नरेंद्र धारणे यांना प्रदान करण्यात आला .सर डॉ . मो . स . तथा आप्पासाहेब गोसावी लोकसेवक पुरस्कार नाशिक येथील .सी.आर. पाटील यांना प्रदान करण्यात आला .
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सेवाव्रती अनुबंधी पाच दांपत्यांचा गौरव करण्यात आला. सौ. रश्मी भट व श्री राजेंद्र भट, अनघा व अजित चिपळुणकर, ज्योती व राजीव गाडगीळ, नीलम व मुकुंद बोकील, अपर्णा व शैलेश कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ .सौ .सुनंदाताई गोसावी संगीतरत्न पुरस्कार प्रसिद्ध तबला वादक नितिन वारे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आदर्श संस्था पुरस्कार नाशिक येथील जनजाती कल्याण आश्रम संस्थेला देण्यात आला. वैदेही सर्जनशील पुरस्काराने कु. गौतमी वाघ नाशिक हिला मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत केले. गुणवंत व प्रज्ञावंत म्हणून सम्राज्ञी मंडलिक, अक्षदा वारे, जान व्ही मंडलिक, श्रुती नहार , पर्वणी जोशी अभिजितसिंग यांना गौरविण्यात आले .
गो.ए. सोसायटीच्या सचिव व खजिनदार प्राचार्या डॉ दीप्ती रेशपांडे ह्यांनी सर डॉ.मो.स. गोसावी सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकी, शिक्षणाविषयी असलेली तळमळ सांगून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.याप्रसंगी सर डॉ. मो.स.तथा आप्पासाहेब गोसावी यांच्या जीवनावर आधारीत ज्ञानाब्धि या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्राचार्या डॉ . उल्हास रत्नपारखी यांच्या ज्ञानेश्वरीतील मंगल चरणे भाग २ व शिवज्योती विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .सत्कारार्थीच्या वतीने शैलेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले .आज आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त करून प्रतिष्ठानच्या कार्यासाठी आपला सहभाग राहिल असे त्यांनी सांगितले. ‘
मान्यवरांमध्ये लश्मीकांत जोशी , मुकुंद येवलेकर , दिपक कुलकर्णी , प्रा . छाया लोखंडे , मनिषा बागुल यांचा सन्मान झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा . जोशी यांनी केले यानंतर या सोहळ्याच्या अध्य१त्रा स्वामिनी स्थितप्रज्ञासरस्वतीनंद यांनी पसायदानाचे महत्त्व सांगितले व प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतूक केले .या कार्यक्रमाला नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.