आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
β : नाशिक रोड :⇔बिटको महाविद्यालयात ३ जानेवारीला “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा “-( प्रतिनिधी : संजय परमसागर)
β : नाशिक रोड :⇔बिटको महाविद्यालयात ३ जानेवारीला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा "-( प्रतिनिधी : संजय परमसागर)
0
1
2
3
6
4
बिटको महाविद्यालयात ३ जानेवारीला “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा “
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :शनिवार : दि. ३० डिसेंबर २०२३
β⇔ नाशिक रोड ,ता. ३० ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालय व फुले आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ( फासा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३ जानेवारी २०२४ रोजी आंतरमहाविद्यालयीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सदर स्पर्धा आयोजित केली जाते . स्पर्धेचे हे २६ वे वर्ष असून या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयाने दोन विद्यार्थ्यांचा एक संघ पाठवावा. स्पर्धकांनी आपली कविता स्वलिखित, स्वनिर्मित व मराठी भाषेतील असावी, अशी अट आहे. विजयी संघाला महाविद्यालयाचा फिरता करंडक चषक देण्यात येणार आहे . तसेच उत्कृष्ट कवितेला प्रथम ५००० रुपये, द्वितीय ३००० रुपये आणि तृतीय २००० रुपये अशी सर्व पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत . अशी माहिती प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी , विज्ञान शाखा समन्वयक डॉ. के. सी. टकले, उपप्राचार्य डॉ.अनिल कुमार पठारे, उपप्राचार्य आकाश ठाकूर व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एम.लोखंडे यांनी दिली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०
0
1
2
3
6
4