





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात ‘संविधान दिवस’ उत्साहात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि 26 नोव्हेंबर 2024
β⇔त्र्यंबकेश्वर (नाशिक), ता.26 (प्रतिनिधी: डॉ.भागवत महाले):-मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार,आय. क्यू .एस. सी. प्रमुख प्रा. डॉ. शरद कांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भागवत महाले, प्रा. मनोज मगर हे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलतांना म्हणाले की, भारताच्या संविधानात असणाऱ्या मूल्यांची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाली आणि जाणीव जागृती नागरिकात व्हावी तसेच संविधानाचे तत्वांचा प्रत्येकाच्या जीवनात वापर व्हावा याचं हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी व नागरिकांना आपले अधिकार, कर्तव्ये, याची जाणीव व्हावी आणि समजात वागताना त्यांचा वापर करुन समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी कायदा, घटना माहिती असणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी अधिकार , कर्तव्ये विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भागवत महाले यांनी संविधान निर्मिती प्रक्रिया सांगून भारताच्या राज्यघटनेवर असलेल्या विविध देशातील संविधानाचा प्रभाव कसा आहे हे सांगितले. त्यानंतर संविधान दिन साजरा करण्यामागचे महत्त्व सांगुन 2015 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे असे सांगितले. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय सर्वधर्मसमभाव, एकात्मता या विविध मूल्यांची जपणूक करून समाजात सलोख, शांतता निर्माण करण्यासाठी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे, असे सांगितले. तसेच आपल्या संविधानाच्या तत्त्वावर भारत देश चालतो आपण सर्वांनी संविधानाचे काटेकोर पालन केले पाहिजेत असे सांगितले. यावेळी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ भागवत महाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी आय. क्यू .एस. सी. प्रमुख प्रा. डॉ. शरद कांबळे, प्रा. संदीप गोसावी, प्रा.डॉ. संदीप निकम, प्रा. डॉ.प्रशांत रणसुरे, प्रा. मनोज मगर, प्रा.समाधान गांगुर्डे, प्रा. दिनेश उकिरडे, प्रा. श्रीमती शाश्वती निरभवने, प्रा. अनिल खेडकर, प्रा. श्रीमती विद्या जाधव, प्रा. विष्णू दिघे, प्रा. ऋषिकेश गोटरणे, प्रा. प्रणिल जगदाळे, प्रा. संकेत भोर, प्रा. आशुतोष खाडे, प्रा. निलेश म्हरसाळे, प्रा. डॉ. जया शिंदे, प्रा. श्रीमती वैशाली दामले, प्रा. श्रीमती ललिता सोनवणे, प्रा. श्रीमती श्वेताली सोनवणे, डॉ वैशाली जाधव, डॉ. वर्षा जुन्नरे, भगवान करवार, दीपक मेढे, आदींसह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विष्णू दिघे यांनी केले.

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510