ब्रेकिंग
β :नाशिक :⇒ जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी लाटणाऱ्या टोळ्या आवरा ! आदिवासी जमिनी गैरव्यवहाराविरोधात आक्रोश आंदोलन
β :नाशिक :⇒ जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी लाटणाऱ्या टोळ्या आवरा ! आदिवासी जमिनी गैरव्यवहाराविरोधात आक्रोश आंदोलन
0
1
2
3
6
4
नाशिक जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी लाटणाऱ्या टोळ्या आवरा ! आदिवासी जमिनी गैरव्यवहाराविरोधात आक्रोश आंदोलन
β : नाशिक :⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार, दि . 25 , ऑगस्ट 2023
β :⇒नाशिक : ता . २५ : खास प्रतिनिधी : – नाशिक शासनाने कायद्याने आदिवासींच्या जमिनीला संरक्षण दिले असले, तरी प्रत्यक्षात मात्र इगतपुरी तालुक्यात आदिवासींच्या अनेक जमिनी कायदेशीर क्लुप्त्या लढवून इतरांना विकल्या जातात असतात . त्यावर रिसॉर्ट , हॉटेल्स अनेक व्यवसाय उभे केले जात आहेत . महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांमुळे आदिवासींच्या जमिनीच्या व्यवहारांचे भूमाफियागिरी सुरू असल्याचा आरोप करीत शुक्रवारी आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्यात आला . गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघाला, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील विविध गावातील विविध गावातील आदिवासी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी ,त्रंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरीसह अनेक आदिवासी तालुक्यात आदिवासींच्या जमिनी नाना प्रकारे कायद्यातील पळवाटा शोधून विक्रीचा धंदा भूमाफीया यांनी मांडला आहे. त्यात भूमाफियाना महसूल विभागातील अधिकारी हातभार लावत असल्याने काही वर्षात अनेक आदिवासींच्या जमिनीची मालकी बिगर आदिवासींकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत . गेल्या दहा ते वीस वर्षात हे प्रकार वाढले असून त्यात आदिवासींना बेघर करण्याचे हे प्रकार महसूल यंत्रणेने थांबावेत , अशी आंदोलन कर्त्याची मागणी केली आहे . आदिवासी बांधवांच्या जमिनी फसवून लाटण्याचे गैरप्रकार वाढलेले आहेत . भूमाफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने आदिवासींना लुबाडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारात अशिक्षित आदिवासींच्या नावाने बँकेत खाते उघडले जाते . आदिवासींच्या सह्या घेऊन भूमाफिया आदिवासींच्या खात्यांचे व्यवहार आणि पासबुक हाताळत असतात.
आदिवासींचे जमिनींचे व्यवहार झाल्यावर सोयीनुसार आदिवासींच्या खात्यावरील पैसे स्वतःच्या खात्यात वळवून ही भूमाफियागिरी चालत असते . प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वरदहस्थाशिवाय हे शक्य नसल्याने त्यांची चौकशी करावी तसेच अशा रॅकेटचा पर्दाफास करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आदिवासी आंदोलकांनी केली आहे. काही वर्षात आदिवासींच्या जमिनी कोणत्या बिगर आदिवासींकडे कशा पद्धतीने झाल्या , याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी आदिवासी बांधवांकडून मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील भूमाफियांच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा काही महत्त्वपूर्ण दृष्टिक्षेपात असलेले महत्त्वाच्या मागण्या आदिवासी जमिनी हस्तांतर चौकशी व्हावी, सदर प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी, आदिवासींच्या जमिनी आदिवासींना हस्तांतरित करण्यात यावेत, भूमाफियांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा विविध महत्त्वपूर्ण मागण्या आदिवासी आंदोलकांनी केली आहे.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
0
1
2
3
6
4