पर्यावरण प्रेमी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते “पर्यावरण अभ्यास” या संदर्भ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 3 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिकरोड, दि.2 (प्रतिनिधी : संजय परमसागर):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील चांडक बिटको चांडक महाविद्यालयातील डॉ. सुधाकर बोरसे, डॉ. सुनिता वि.रणाते, डॉ. अनिल सावळे, डॉ. सुनीता अहिरे व डॉ. सचिन गोवर्धने या सर्व लेखकांनी अतिशय सुंदर प्रकारे “पर्यावरण अभ्यास’ या संदर्भ ग्रंथात पर्यावरणाच्या विविध बाबीचे सखोल लेखन केले आहे. सदर संदर्भ ग्रंथ गोखले एज्युकेशन संस्थेचे माजी सचिव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ञ सन्माननिय स्वर्गीय डॉ. मो. स. गोसावी सर यांना समर्पित केला असून विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
दि.२ फेब्रुवारी रोजी पर्यावरण प्रेमी, साहित्यिक, अनेक विविध विषयाचा सखोल अभ्यास असणारे सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते नाशिक मध्ये हा प्रकाशन सोहळा अतिशय आनंदाने पार पडला. कार्यक्रम प्रसंगी डॉ. सुनिता रणाते यांनी प्रस्तावित केले तर डॉ. सुधाकर बोरसे यांनी पुस्तकासंबधी परिचय करून दिला त्यानंतर प्रकाशन सोहळा अतिशय आनंदी वातावरणात करण्यात आला. सन्माननिय राज साहेब ठाकरे यांनी आपले पर्यावरण संबधी विचार मांडताना सर्व लेखकांचे कौतुक केले आणि पर्यावरणांचे संवर्धन आणि खऱ्या अर्थाने संरक्षण करणे हे स्वतः पासून व्हायला हवे एवढेच नव्हे तर आजही वन कटाई अनेक कारणासाठी होत आहे ते थांबले पाहिजे. जंगलाचे रक्षण व वृक्षारोपण करण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टीने चुकीचे काही होत असेल तर ते स्पष्टपणे सांगता आले पाहिजे.
सत्य मांडताना विरोध होत असेल तर ते पर्यावरण संवर्धनासाठी विरोध स्वीकारण्याची तयारी पाहिजे ,पर्यावरणाचे साध्या सोप्या भाषेत लिखाण करणे आणि सखोल अध्ययन करणे आवश्यक आहे उदाहरणा दाखल टायटॅनिक सिनेमाचा हिरो लिऑनार्दो डी कॅप्रियो हा पर्यावरण विकासासाठी कशा पद्धतीने कार्य करतो,यासंबंधी त्यांनी वर्णन केले. खऱ्या अर्थाने पर्यावरण विकासासाठी प्रत्येक व्यक्तीकडून सुरुवात होणे गरजेचे आहे , असे महत्वपूर्ण विचार लेखकांशी चर्चात्मक पद्धतीने सन्माननिय राजसाहेबांनी व्यक्त केले. एवढेच नव्हे तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार सदर संदर्भ ग्रंथ विद्यार्थी वर्गासाठी अंत्यत उपयुक्त आहेच परंतु पालक, निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी या सर्वासाठी अतिशय उपयुक्त आहे. या प्रसंगी अमित साहेब ठाकरे, पराग शिंत्रे, किशोर शिंदे , अविनाश अभ्यंकर, रतन कुमार इचम, सुदाम कोंबडे, अंकुश पवार,सुजाता डेरे ,मनीषा सावळे ,विजय रणाते इत्यादी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष व कोषाध्यक्ष प्राचार्य आर. पी. देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, नाशिकरोड शाखा सचिव प्राचार्य व्ही.एन. सूर्यवंशी, बिटको महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी तसेच सर्व उपप्राचार्य , विभाग प्रमुख यासह प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष अभिनंदन केले. संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510