Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक :⇔दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना ८% लाभांश जाहीर (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β : नाशिक :⇔दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना ८% लाभांश जाहीर (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

018491

दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना ८% लाभांश जाहीर

β : नाशिक :⇔दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना ८% लाभांश जाहीर (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : नाशिक :⇔दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना ८% लाभांश जाहीर (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार: दि 05 ऑक्टोबर 2024

β⇒ दिंडोरी, ता. 05  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ) – दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबर रोजी अध्यक्ष मा. श्रावण भोये यांच्या नेतृत्वाखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात गुणवंत शिक्षकांच्या सन्मानाने झाली. त्यानंतर संस्थेचे आर्थिक हिशेब सादर करण्यात आले, जे सर्वानुमते मंजूर झाले. यावर्षी लाभांश ७ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला, ज्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
         सभेत कर्जमर्यादा वाढवणे, सभासदांची संख्या वाढवणे, आणि इतर सभासदांच्या हिताचे अनेक मुद्दे चर्चिले गेले. चेअरमन श्रावण भोये व संचालक मंडळाने उपस्थित सभासदांच्या शंकांचे निरसन केले व त्यांच्या मते ऐकून घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस संजय पगार, दिंडोरी तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव, शिक्षक संघाचे नेते धनंजय वानले, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष दुर्वादास गायकवाड आणि आदिवासी संघटनेचे अनिल गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते. संजय पगार यांनी संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
        मंचावर व्हा. चेअरमन पंकजकुमार गवळी, मा. सचिव दादाजी अहिरे, संचालक युवराज भरसट, योगेश बच्छाव, गितांजली भोये, उषा दुगाणे, कौशल्या गायकवाड, दीपाली थोरात, प्रविण गरूड, शांताराम आजगे, मधुकर आहेर, सचिन वडजे, सुनिल पेलमहाले, बाळू जाधव, नंदू महाले, तसेच कर्मचारी राकेश थेटे व ऋषीकेश खांदवे उपस्थित होते.
           गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकांमध्ये मनोज नंदन, दीपक खैरनार, संतोष चौरे, स्वप्निल जाधव, मनोहर गांगोडे, दत्ता राठोड, अशोक पवार, पुष्पा चौधरी, गायत्री राऊत, दीपक चौधरी, अशोक अहिरे, शिवाजी पाडवी, सुनंदा गायकवाड यांचा समावेश होता. प्रमोशन मिळालेले शिक्षक किरण शिंदे (विस्तार अधिकारी), शंकर ठाकरे (मुख्याध्यापक), एकनाथ पाटील (मुख्याध्यापक), तसेच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेती योगिता मोरे यांचा देखील सन्मान करण्यात आला. भेचे सूत्रसंचालन पंकजकुमार गवळी व दादाजी अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश बच्छाव यांनी केले.

β : नाशिक :⇔दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना ८% लाभांश जाहीर (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : नाशिक :⇔दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना ८% लाभांश जाहीर (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१० 

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!