





शिक्षकांच्या बदल्या,निवड श्रेणी व चटोपाध्याय प्रश्नी , शिक्षक परिषदचे सीईओं आशिमा मित्तल यांना निवेदन !

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 8 जून 2024
β⇔ दिंडोरी, दि.8 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाअंतर्गत बदली ,निवड श्रेणी व चटोपाध्याय आदी समस्यांबद्दल जिल्हा परिषद नाशिक सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्या, जिल्हा अंतर्गत बदली स्थळी नकार देण्याची संधी उपलब्ध करून देणे. पदवीधर व मुख्याध्यापक पदोन्नती त्वरित करून नंतर बदल्या करणे, संवर्ग एक प्रथम बदलीचा लाभ घेताना सेवेची अट नसावी. पदवीधर व मुख्याध्यापकांच्या बदल्या करण्यात याव्या. तसेच तालुकास्तरावरून निवड श्रेणी व चटोपाध्याय प्रस्ताव त्वरित जिल्हा परिषदला जमा करून कार्यवाही व्हावी.
याप्रसंगी जिल्हा नेते रमेश गोहिल, उपाध्यक्ष दिपक खैरनार, दिंडोरी तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव, इगतपुरी तालुका अध्यक्ष वैभव उपासनी,चांदवड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, दिंडोरी सरचिटणीस रवींद्र ह्याळिज आदी पदाधिकारी उपस्थित होते.येत्या दोन दिवसात शिक्षक परिषदेचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा करून शिक्षकांना न्याय मिळवून देणार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)