शिक्षक परिषद दिंडोरी तालुका कार्याध्यक्षपदी रविंद्र भरसट,
जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण देशमुख, संघटकपदी कैलास बांगर
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 5 फेब्रुवारी 2024
β⇔ दिंडोरी, दि.5 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ‘हॉटेल रॉयल हेरिटेज’ येथे झालेल्या राज्य कार्यकारणी सभेत दिंडोरी तालुका शाखेमध्ये कार्याध्यक्षपदी रवींद्र रघुनाथ भरसट (वणी),संघटकपदी कैलास बांगर( दिंडोरी नं.१) यांची निवड करण्यात आली. यानिवडी संदर्भात तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी सुचित केले तर अनुमोदन रमेश गोहिल यांनी दिले.
यावेळी सुरेश सातपुते व चिंतामण मोहन (कळवण) आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षक परिषदेत प्रवेश केला. याप्रसंगी कैलास पाटोळे यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून तर प्रविण देशमुख यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.रवींद्र भरसट यांच्या माध्यमातून शिक्षक परिषदेला एक होतकरू सामाजिक कार्यकर्ता लाभला असल्याची चर्चा आहे.
शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे व राज्य कार्यवाह संजय पगार यांनी रवींद्र भरसट यांना नियुक्तीपत्र सुपूर्त केले. याप्रसंगी जिल्हा कार्यवाह राजेंद्र खैरनार, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र खोर, शांताराम कापसे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक खैरनार,सुदाम बोडके, तालुका कार्यकारी अध्यक्ष अशोक पवार, तालुका कार्यवाह रवींद्र ह्याळिज, कार्याध्यक्ष सुभाष बर्डे ,राजेंद्र कापसे, कोषाध्यक्ष नितीन शिंदे, उपाध्यक्ष प्रविण सोनवणे,विश्वास आहेर, उत्कर्ष कोंडावार,किरण पाटील,प्रतिनिधी दादा इथापे,प्रमोद देवरे, संजय देवरे,दिपक वसावे, नवनाथ गोंड , समाधान गाडे , श्रीकांत बिरादार आदी उपस्थित होते.
“माझी नोकरीची सुरुवात राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या रायगड जिल्ह्यातील शाळेत झाली आज माझ्या मातृभूमीत दिंडोरी तालुक्यात बदली होताच राज्य कार्यवाह संजय पगार , तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी दिलेली जबाबदारीस न्याय देण्याचा प्रयत्न करेल नक्कीच माझ्या हातून चांगले काम होईल.”–रविंद्र रघुनाथ भरसट (कार्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद दिंडोरी)
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510