





संदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा सायन्सेसमध्ये “राष्ट्रीय क्रीडा दिन” उत्साहात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 29 ऑगस्ट 2024
β⇔महिरावणी (नाशिक), 30 (प्रतिनिधी : प्रा. डॉ.कमलेश दंडगव्हाळ) :- संदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा सायन्सेसमध्ये २९ ऑगस्ट रोजी “राष्ट्रीय क्रीडा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय क्रीडामध्ये एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या आणि भारतीय हॉकी संघाचे कर्णधार म्हणून तीन वेळा भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस विशेष मानला जातो.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बोरसे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यांनी आपल्या भाषणात मेजर ध्यानचंद यांच्या खेळातील योगदानाचे महत्व विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आणि खेळाच्या महत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात, अल्ताफ राजा आणि सुवर्णा पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अपूर्व योगदानाची माहिती दिली. त्यांनी ध्यानचंद यांचे जीवन, त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील यशोगाथा आणि भारतीय हॉकीवरील प्रभाव याबद्दल माहिती प्रदान केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक डॉ. परेश रेगे आणि डॉ. संदीप पाटील यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम व्यवस्थितपणे व उत्साही वातावरणात पार पडला. भाषणांची जबाबदारी अल्ताफ रड्डे आणि सुवर्णा पाटील यांनी यशस्वीपणे पार केली. त्यांच्या प्रभावी भाषणामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा आणि खेळांचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले. या दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी क्रीडा व खेलांच्या महत्वाचे गांभीर्य आणि प्रेरणा अनुभवली, आणि मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची मान्यता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी फार्मच्या विद्यार्थिनी मुस्कान श्रीवास्तव आणि गौरी मिसरी यांनी केले. त्यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची लयबद्धता आणि सांस्कृतिक रंग वाढवला.