





भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी जिल्हाध्यक्षपदी ॲड.सचिन धारराव यांची नियुक्ती
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : गुरुवार : दि. 19 ऑक्टोबर 2023
β⇔नाशिक (जेलरोड), ता.19 ( प्रतिनिधी : भागवत महाले ) :- भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी ॲड.सचिन सुदाम धारराव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीच्या नाशिक येथील एका कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी , प्रदेश संघटनमंत्री रविंद्रजी आनसपुरे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित व जिल्हाध्यक्ष प्रा. सुनीलजी बच्छाव यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देवून सत्कार करण्यात आला.ॲड.सचिन धारराव यांच्या नियुक्तीबद्दल वकिली क्षेत्रातील सर्व जेष्ठ व तरुण मंडळीं, नाशिक जिल्हा नोटरी संघटना व इतर सामाजिक संघटनांनी त्यांच्या ह्या निवडीचे स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा देत सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
