





जि.प. आदर्श शाळा कोटबेलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे केली मतदार जनजागृती

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 27 ऑक्टोबर 2024
β⇔ सटाणा (नाशिक), ता.27 (प्रतिनिधी : वसंत सोनवणे):- आज जि.प. आदर्श शाळा, कोटबेलच्या विद्यार्थ्यांनी कोटबेल गावात मतदार जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषणांद्वारे मतदारांना 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. गावाच्या मुख्य चौकात उत्कृष्टपणे सादर केलेल्या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी “पैसे घेऊन मत वाया घालवू नका” आणि “18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार नोंदणी करा” अशा महत्वाच्या संदेशांचे जनजागरण केले.

पथनाट्यातील उत्साहपूर्ण घोषणांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी “अंगात भरलय वारं, मतदानाची नशा आली, दण दण दणक्यात मतदान करूया” या घोषणांसह आपल्या सादरीकरणाला ठेका धरला. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.या पथनाट्यात नव्या भामरे, हिरकणी व सायली खैरनार, प्रज्ञा केदारे, मोहिनी खैरनार, प्रतीक्षा खैरनार, जिविका खैरनार, आदित्य खैरनार, रोशन जाधव, कुणाल जाधव, कृष्णा खैरनार, ओम खैरनार, जयदीप खैरनार, दर्शन खैरनार, साक्षी कांदळकर, ज्ञानदा खैरनार, स्वरांगी शिंदे, तेजल आणि गायत्री खैरनार यांनी सहभाग घेतला.
या पथनाट्याच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता पाटील, पदवीधर शिक्षक श्री. वसंत सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक श्री. विलास देवरे, संजय गातवे, प्रविण चव्हाण, मनोहर गांगुर्डे, प्रशांत देवरे, प्रविण ह्याळीज, विपूल राऊत, निरभवणे सर, श्रीमती वासंती मावची, आहिरे मॅडम, चंचल खैरनार, आणि मनीषा सूर्यवंशी यांनी विशेष प्रयत्न केले.

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510