





संदीप फाऊंडेशन संचालित फार्मसी महाविद्यालयात सर्पदंशावर मार्गदर्शन
⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: सोमवार, दि. 21, ऑगस्ट 2023
⇒ महिरावानी नाशिक: 21 ( प्रतिनिधी : डॉ.कमलेश दंडगव्हाळ ) :- येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयात दि. २१ ऑगस्ट सापांविषयी माहिती व सर्पदंशावर मार्गदर्शन करण्यात आले. सर्पमित्र मयूर वानखेडे, राहुल मराठे यांनी विद्यार्थाना विविध सापांच्या जाती तसेच सर्पदंशावरील प्रथमोपचार पद्धतीवर मार्गदर्शन केले.
साप दिसताच त्यांना मारू नका. सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्या असे आवाहन कारणात आले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मार्फत आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बोरसे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रस्तावना केली. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत चिखले व प्रा. डॉ. सारिका कांबळे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले व आभार व्यक्त केले.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०
