





प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांना डिजिटल ट्रेनिंग लीडरशीप ऑवार्डे, तर प्रा. छाया लोखंडे,प्रा. प्रणेता निकुंभ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

β : नाशिक :⇔ प्रा. छाया लोखंडे,प्रा. यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान (प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 06 सप्टेंबर 2024
β⇔नाशिक(शहर) , दि.06 (प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे ):-येथील एस. एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांना कौन्सील फॉर टीचर्स प्रोफेशनल डेव्हलपमेंट इंडिया आणि सोशल डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाऊंडेशन ह्यांच्या वतीने डिजिटल ट्रेनिंग लीडरशीप अॅवार्डे देवून गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयातील प्रा. छाया लोखंडे यांना नाशिक येथील महर्षी लघुचित्रपट संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. वाणिज्य शाखेच्या प्रा. प्रणेता निकुंभ यांना श्रीभक्ती धारा आध्यात्मिक परिवार समर्पण स्व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांचे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर.पी. देशपांडे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नितीन सोनगिरकर कला शाखेचे समन्वयक डॉ. अविराज तायडे, कनिष्ठ विभागाच्या समन्वयक शोभा त्रिभुवन, मैथिली लाखे अधीक्षक प्रशांत आंबेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )