१९ ऑक्टोबरला डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांचा सेवापूर्ती व अभिष्ट सोहळा
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : मंगळवार : दि 17 ऑक्टोबर 2023
β⇔नाशिक, ता 17 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे -गिरी ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.बी.के.ए.के. महिला महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्राचार्या संस्थेच्या सचिव व खजिनदार डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांचा सेवा पूर्ती व अभिष्ट सोहळा दि. १९ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त व सहखजिनदार डॉ. आर. पी. देशपांडे , महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डी .के. गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. विशेष अतिथी म्हणून संस्थेचे प्रकल्प संचालक श्री प्रदीप देशपांडे उपस्थित रहाणार आहेत. महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. महाविद्यालयाच्या प्रगतीत बहुमोल योगदान देणाऱ्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे. असा विश्वास सोहळ्याच्या आयोजक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सौ. कविता पाटील आणि डॉ. सौ. नीलम बोकील अशी माहिती दिली आहे.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०