β : नाशिक :⇔ श्री मार्कंडेश्वर पर्वतावर सोमवती अमावस्या व आठ सप्टेंबरला ऋषिपंचमीला जाण्यासाठी भाविकांना बंदी-(प्रतिनिधी : भागवत महाले )
β : नाशिक :⇔ श्री मार्कंडेश्वर पर्वतावर सोमवती अमावस्या व आठ सप्टेंबरला ऋषिपंचमीला जाण्यासाठी भाविकांना बंदी-(प्रतिनिधी : भागवत महाले )
श्री मार्कंडेश्वर पर्वतावर सोमवती अमावस्या व आठ सप्टेंबरला ऋषिपंचमीला जाण्यासाठी भाविकांना बंदी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 02 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.02 (प्रतिनिधी : भागवत महाले ):- सप्तशृंगी गडाजवळ असलेल्या मार्कंड पिंपरी, (ता. कळवण) श्री मार्कंडेेश्वर पर्वतावर आज सोमवारी “सोमवती अमावस्या” व आठ सप्टेंबरला ऋषिपंचमी असल्याने श्री मार्कंडेेश्वर यात्रेसाठी भाविकांना ऋषी पर्वतावर जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांनी दिली आहे. श्रावण सोमवार व सोमवती अमावस्या निमित्त मार्कंड ऋषी पर्वतावर मंदिरात दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यासह बाहेरून राज्यातून व पंचक्रोशीतून हजारोच्या संख्येने भावी मार्कंडेय ऋषी पर्वतावर दर्शनासाठी येत असतात. मागील अनेक वर्षी सोमवती अमावस्या वेळी 90 हजार ते एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला होता. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणा त झालेल्या गर्दीतून वणी, (ता. दिंडोरी) भागातून काही भाविक अवघड मार्गाने जात असताना पाय घसरून खोलदरीत पडून जखमी झाले होते. मुळाने बारीतही चार ते पाच भावी पाय घसरून जखमी झाले होते. मार्कंड ऋषी पर्वतावर जाताना सपाटी भागाजवळ पर्वतावर जाण्यासाठी अरुंद असा लोखंडी जिना दुर्लक्षित जीर्ण स्वरूपाचा व तुटल्याचा परिस्थितीत आहे. सध्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे भाविकांना परवतावर जाणे व उतरणे जीवित आस धोकादायक असून चेंगराचेंगरीची शक्यता आहे. त्यामुळे आज व ऋषीपंचमीला ८ सप्टेंबरला भाविकांना मार्कंडेय ऋषी पर्वतावर जाण्यास बंदी घातलेली आहे. पळतावर जबरदस्ती जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाविकांवर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )