कौशल्याधारित शिक्षणपद्धती आणि भारतीय विज्ञानाचा अभ्यास आवश्यक – प्रा. डॉ. जयदीप निकम
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 28 फेब्रुवारी 2024
β⇔नाशिकरोड,दि.28(प्रतिनिधी : संजय परमसागर):-येथील बिटको महाविद्यालयातील सायन्स असोसिएशन आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ निमित्ताने ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या संकल्पनेवर आधारित नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील निरंतर शिक्षण आणि आरोग्यशास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. जयदीप निकम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जयदीप निकम यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा आढावा घेतला. प्राचीन नालंदा, तक्षशीला विज्ञापीठ यांचा संदर्भ देवून तत्कालीन परिस्थिती बाबत माहिती दिली. कौशल्याधारित शिक्षण आणि भारतीय विज्ञानाचा अभ्यास आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी परदेशात न जाता भारतातच संशोधन करावे. रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी फक्त अमेरिका किंवा युरोप मध्ये न जाता आफ्रिका खंडातील अनेक अविकसित देशात उपलब्ध असलेल्या शेती, खनिजसंपत्ती निर्माण विषयक आणि तेथील तत्सम रोजगाराच्या संधी हासील कराव्यात असेही आवाहन त्यांनी केले. ‘केमिस्ट्री एज्युकेशन अॅण्ड मिरॅकल’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. जयदीप निकम यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे अखेरीस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी देखील याप्रसंगी मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ संजय पवार, आभारप्रदर्शन प्रा. डॉ. राजश्री नाईक आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोरी धुमाळ यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आकाश ठाकूर, सायन्स शाखेचे समन्वयक प्रा डॉ कल्याण टकले आणि सायन्स असोसिएशनचे सदस्य प्रा. गणेश दिलवाले, प्रा. राहुल उपळाईकर, प्रा. डॉ. दिनेश बोबडे, प्रा. डॉ. हेमंत भट, प्रा. डॉ. कैलास बोरसे तसेच प्रा. डॉ. दिलीप शिंपी,प्रा. डॉ. विशाल माने, प्रा. डॉ. मीनाक्षी राठी, प्रा. दीपक बोरस्ते, प्रा. संदीप पिंगळे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.