Breaking
आरोग्य व शिक्षणनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिक :⇒संदीप फॉउंडेशन फार्मसी महाविद्यालयांत स्टुडन्ट इंडक्शन कार्यक्रम संपन्न ! ( प्रतिनिधी : कमलेश  दंडगव्हाळ )

β : नाशिक :⇒संदीप फॉउंडेशन फार्मसी महाविद्यालयांत स्टुडन्ट इंडक्शन कार्यक्रम संपन्न ! ( प्रतिनिधी : कमलेश  दंडगव्हाळ )

018491

 संदीप फॉउंडेशन फार्मसी महाविद्यालयांत स्टुडन्ट इंडक्शन कार्यक्रम संपन्न !

β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. १४ सप्टेंबर २०२३ 

  β⇒महिरावनी (नाशिक), ता. १४ ( प्रतिनिधी : कमलेश  दंडगव्हाळ:- येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयात दि. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान स्टुडन्ट इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रथम वर्ष बी. फार्म. आणि डी. फार्म. मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान , कार्यशाळा यांचा समावेश होता. संदीप फाउंडेशन इंटरनॅशनल अफेअर्सचे प्रमुख डॉ. दीपक पाटील हे अतिथी आणि संदीप पॉलीटेकनिक प्राचार्य डॉ. धर्माधिकारी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

                   कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बोरसे यांनी फार्मसी क्षेत्रातील संधी, त्याच बरोबर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी घेतले उपक्रम आदी नमुद करताना ते म्हणाले ,कि संदीप फार्मसी हे विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीचे कॉलेज आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता संदीप फौंडशन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमानिमित्त अतिथी व्याख्यानांचे आयोजन केले. होते. पहिले व्याख्यान प्रभुजी सुकुमार गौर दास, (अध्यक्ष, इस्कॉन, नाशिक) यांनी केले. प्रभुजींनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले.  डॉ. स्वाती चव्हाण (एमडी, मानसोपचार तज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक.) यांनी भावनिक नियंत्रण आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांनी करिअरवर लक्ष केंद्रित कसे करायचे आणि अभ्यासातील तणाव कसे हाताळायचे यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना फार्मसीमधील प्रमुख विभाग जसे की फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल आनालिसिस, फार्माकोग्नोसी आणि फार्मसी प्रॅक्टिसची अधिक चांगल्या प्रकारे ओळख करून विभागप्रमुखांनी सादरीकरण केले.
                     नीलेश बोराडे (सॉफ्ट स्किल ट्रेनर, नाशिक) यांनी संवाद कौशल्याचा विकास आणि आत्मविश्वास कसा वाढवायचा या विषयावर चर्चा केली.  विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अनेक मनोरंजक पूर्ण उपक्रमही घेतले.  विक्रम दाते विद्यार्थ्यांसाठी संदिप फाउंडेशनची ERP प्रणाली हाताळण्यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कॅम्पस भेटीसाठी नेण्यात आले. इंडक्शन कार्यक्रमाचे शेवटचे सत्रात क्रीडा उपक्रम होते, ज्याचे समन्वय डॉ. संदिप पाटील (खेळ संचालक) यांनी केले. दैनंदिन जीवनात व्यायाम आणि क्रीडा क्रियाकलापांचे महत्त्व स्पष्ट त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक खेळांचा आनंद लुटला.
                नीलेश बोराडे (सॉफ्ट स्किल ट्रेनर, नाशिक) यांनी संवाद कौशल्याचा विकास आणि आत्मविश्वास कसा वाढवायचा या विषयावर चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अनेक मनोरंजक पूर्ण उपक्रमही घेतले. विक्रम दाते यांनी विद्यार्थ्यांसाठी संदिप फाउंडेशनची ERP प्रणाली हाताळण्यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कॅम्पस भेटीसाठी नेण्यात आले. इंडक्शन कार्यक्रमाचे शेवटचे सत्रात क्रीडा उपक्रम होते. ज्याचे समन्वय डॉ. संदिप पाटील (खेळ संचालक) यांनी केले. दैनंदिन जीवनात व्यायाम आणि क्रीडा क्रियाकलापांचे महत्त्व स्पष्ट त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक खेळांचा आनंद लुटला. स्टुडन्ट इंडक्शन कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. अक्षदा काळे व प्रा. शंकर येलमामे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले व आभार व्यक्त केले. संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा व अकॅडेमिक फॅसिलिटेर प्रा. प्रमोद करोले यांनी विद्यार्थाना शुभेच्छा दिल्या. 

β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले, मो.८२०८१८०५१०  

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!