





सिन्नर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 9 ऑगस्ट 2024
β⇔सिन्नर(नाशिक), दि.9 (प्रतिनिधी :सुरेश इंगळे ):- सिन्नर येथील आदिवासी उत्सव समितीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पायी रॅली, प्रबोधन सभा, आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे, सह्याद्री युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष उदय भाऊ सांगळे, आणि साहित्यिक विजयकुमार कर्डक यांची प्रमुख उपस्थित होते.
रॅलीचे आयोजन हुतात्मा स्मारकापासून सुरू करून बस स्थानकाजवळील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्रिशूल नगर मापरवाडी रोड आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह समोरून दुपारी 12 पासून सायंकाळी चारपर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. ज्यात आदिवासी नृत्य व कलापथकांच्या कार्यक्रमाने उत्सवाला शोभा आणली. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे दुपारी चार वाजता प्रबोधन सभा घेण्यात आली. या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपल्या कला व संस्कृतीचे सादरीकरण केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )