बिटको महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी
β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी-(प्रतिनिधी : संजय परमसागर )
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 19 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिकरोड, दि.19 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती ग्रंथालयात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी त्यांनी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना महाराजांच्या कार्याचा गौरव करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, समस्त भारतीयांचा मार्गदर्शक, कुशल नेतृत्व, प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी राजा असे श्री छत्रपती शिवाजी महाराज…त्यांच्या विविध नीती व कौशल्य, चरित्र याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व गुण आत्मसात करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी संस्थेच्या १०६ व्या स्थापना दिवस निमित्ताने प्रिं. टी. ए. कुलकर्णी यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, ग्रंथपाल एस. व्ही. चंद्रात्रे,विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे, डॉ.विशाल माने, विजय सुकटे, जयंत भाभे,संजय परमसागर, डॉ. आरती गायकवाड, बी. बी. दिवटे,राजू गोडसे, आकाश लव्हाळे, विजय सूर्यवंशी,राजू कनोजिया, साहिल जाधव, मयुरी बर्गे यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले: मो. 8208180510