श्रीक्षेत्र कामत मळा येथे नामसंकीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.22 मार्च 2024
β⇔ देवळा (नाशिक) दि. 22 ( प्रतिनिधी : भगवान शिंदे) :- प्रा.ह.भ.प.भगवान महाराज: सर्व तमाम भाविक बंधू भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे . जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या सदैव वैकुंठ गमननाच्या बीजे प्रित्यर्थ तृतीय दिनी नामसंकीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा श्रीक्षेत्र कामत मळा व ह भ प प्रा. भगवान महाराज शिंदे यांच्या वस्तीवर आयोजित केला आहे. वै. सचितानंद हभप ब्रह्मलीन गंगाधर महाराज व वै. ह भ प ज्ञानेश्वर महाराज शेळके यांच्या कृपाशीर्वादाने ह भ प गुरुवर्य निवृत्तीनाथ महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाने हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात अनेक विद्वान व विचारवंतांची कीर्तने व प्रवचने होणार आहेत.
दिनांक 25 /03/ 2024 रोजी कीर्तन केसरी व अखिल भारतीय वारकरी मंडळ मालेगाव तालुका अध्यक्ष ह भ प तात्या महाराज शिंदे भुईगवान यांचे सायंकाळी 9 ते 11 कीर्तन होईल दिनांक 26/03/2024 रामायणाचार्य व सचिव नर्मदा परिक्रमा महाराष्ट्र राज्य ह भ प राजेंद्र महाराज पाटील दह्याने यांचे सायंकाळी 9 ते 11 कीर्तन होईल दिनांक 27/ 3/2024 रोजी कुशल वकृत्व ह भ प नंदू महाराज गांगुर्डे शेरी यांचे सायंकाळी 9 ते 11 कीर्तन होईल दिनांक 28/ 3/2024 रोजी गुरुवर्य ह भ प निवृत्तीनाथ महाराज काळे गुरुदेव संस्थान विजयनगर व त्र्यंबकेश्वर यांचे सकाळी 9 ते 11 काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या सप्ताहात अनेक नामवंत गायक व वादक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा कीर्तनकार प्राध्यापक ह भ प भगवान महाराज शिंदे यांनी केले आहे.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०