β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि . २५ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिकरोड , ता २५ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- ” संपूर्ण देशात समाजासाठी आपल्याला राष्ट्रभाषा हिंदी महत्त्वाची आहे . अखंड भारताचे नागरिक म्हणून आपल्याला राष्ट्रभाषा हिंदीचा सन्मान करणे व तिचा जास्तीत जास्त वापर करणे हा आपला राष्ट्रधर्म आहे . अनेक स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रात राष्ट्रभाषामध्ये परीक्षा संधी उपलब्ध असून त्याद्वारे अनेकांनी रोजगार प्राप्त करून विविध क्षेत्रात करिअर करत आहेत. आपल्या सांस्कृतिक उजळणीसाठी हिंदीची समृद्धी करण्याचा व तिचा आदर करण्याचे युवकांच्या हातात आहे ,” असे भारतीय जीवन विमा निगमचे भूतपूर्व सैनिक हिंदी अधिकारी श्री. सुबोध मिश्र यांनी सांगितले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने ‘ हिंदी पंधरवडा’ ‘ साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते ‘ हिंदी माध्यमातून रोजगार संधी ‘ या विषयावर बोलत होते . त्यांनी प्रशासकीय सेवेतील अनुभवही कथन केले . याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते सुबोध मिश्र यांसह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , डॉ.आकाश ठाकूर , उपप्राचार्या सुनिता नेमाडे , डॉ. सुरेश कानडे पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश कानडे यांनी केले . याप्रसंगी प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी , संदेश बाविस्कर , सिम्मी चिंडालिया , डॉ. अनिलकुमार पाठारे यांनी मनोगते व्यक्त केली. पंधरवड्यात विविध प्रकारचे उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . सदर स्पर्धेत हिंदी काव्यवाचन , निबंध व हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या . विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रमाणपत्र देण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा पगारे हिने केले तर आभार डॉ. संतोष पगार यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. सुरेखा कानडे , सौ. मिना शिंदे , चंद्रकांत तारू , संदिप आरोटे , डॉ. कौतिक लोखंडे , ग्रंथपाल श्री. श्रीपाद चंद्रात्रे , राहुल पाटील यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज: मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो.८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)