सुरगाणा तालुक्यात पिकअपसह खैरलाकूड तस्करांच्या टोळीकडून 1 लाख 72 हजारचा मुद्देमाल जप्त
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज वृत्तसेवा: प्रतिनिधी – बोरगाव : लक्ष्मन बागुल
बोरगाव (ता.सुरगाणा) ता .१९ ( दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज वृत्तसेवा ) :- सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील पिंपळसोंड जंगलात रात्री दीड वाजेच्या दरम्यान वन कर्मचाऱ्यांनी दगडपाडा या गुजरात भागात खैर लाकडांनी भरलेली नंबर प्लेट नसलेली पिकअप पकडली. वनकर्मचारी गाडीची पाहणी करत असताना वाहन चालक फरार झाला. या वाहनात खैर लाकडाचे 6 नग आढळले आहेत .
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण परिसरातील जंगलात खैर तस्करांच्या टोळीला उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने वेसण घातली आहे. वन विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार वांगण, करंजूल, मांधा मार्गे जाणार असल्याने येथे सापळा रचला. पिकअप वाहनातून वाहतूक केली जात असताना खैराचे 6 नग (1.00 घनमीटर) लाकूड हस्तगत केले. सदर कारवाई उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाण येथील कर्मचारी हिरामण थविल, आनंदा चौधरी,उमाजी पवार, वामण पवार, द्रौपदा चौधरी, अविनाश छगने, उखाराम चौधरी, छगन बागुल, रावजी चौधरी या पथकाकडून कारण्तयात आली उधील तापास सुरु आहे . या कारवाईत खैर लाकडांनी भरलेली विना नंबर प्लेट असलेली पिकअप ताब्यात घेत उंबरठाण कार्यालयात आणली. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून वाहन जप्त केले. यात 22 हजार रुपये किमतीचे खैराचे लाकूड व दीड लाखांची पिकअप असा एकूण 1 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल व वाहन वणी येथील शासकीय आगारात जमा करण्यात आले आहे.
–दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले ,मो ८२०८१८०५१०
