





“एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत डब्लु.एन.एस.
केअर फाउंडेशन अंतर्गत करिअर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 25 सप्टेंबर 2024
β⇔पंचवटी(नाशिक),दि,25 (प्रतिनिधी : अनिता शिंदे ):- एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत डब्लु.एन.एस. केअर फाउंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष करिअर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता प्रतिमा करकाळे यांनी विद्यार्थ्यांना करिअर प्रेरणा आणि मार्गदर्शनाबद्दल महत्वपूर्ण मार्गदशन केले. प्रतिमा करकाळे यांनी विविध करिअर पर्याय, कौशल्य विकासाचे महत्त्व, आत्मविश्वास वाढवण्याच्या तंत्रांवर चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स दिल्या, ज्यामध्ये इंटर्नशिप घेणे आणि नेटवर्किंगच्या महत्त्वावर भर देण्यात आला.
अंतिम वर्षाच्या डी. व बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सक्रियपणे भाग घेतला आणि शंकांचे निरसन करून घेतले, त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल अधिक स्पष्टता मिळाली. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशेने एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला, सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हा कार्यक्रम १८/९/२४ पासून २४/९/२४ पर्यंत राबविण्यात आला. प्रा. डॉ. रूपाली ढिकले, प्रा. ईश्वर वैष्णव यानी या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले.
यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष – नरेंद्रभाई ठक्कर, सचिव देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव उपेंद्रभाई दिनानी,राजेशभाई टक्कर व प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांनी शुभेच्छा दिल्या.भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )