





उज्जैनकर फाउंडेशन नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी डॉ. कृष्णा शहाणे यांची निवड

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 13 जून 2024
β⇔नाशिकरोड, दि.13 (प्रतिनिधी :संजय परमसागर):-शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या संस्थेच्या नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख या पदावर नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, कृषी, संशोधन, पत्रकारिता या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी डॉ. शहाणे यांच्या ‘कमल’ या निवासस्थानी येऊन त्यांना निवडपत्र दिले.या प्रसंगी सौ. कमल शहाणे, शंकरराव शहाणे, डॉ. राजेंद्र शहाणे, इंजी. सौ. विद्या शहाणे, डॉ.सौ. जयश्री शहाणे, विक्रांत डहाळे, सार्थक शहाणे, पार्थ शहाणे, अपूर्वा शहाणे आदी उपस्थीत होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)