0
1
4
9
2
1
बिटको महाविद्यालयात ” राष्ट्रीय क्रीडा दिन “ साजरा
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : मंगळवार , : दि २९ ऑगस्ट २०२३
β⇒ नाशिकरोड, ता.२९ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कला, वाणिज्य व विज्ञान बिटको कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा विभागावतीने ‘ राष्ट्रीय क्रीडा दिन ‘ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी क्रीडाशिक्षक धनंजय बर्वे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . क्रीडा शिक्षक महेश थेटे सरांनी महाविद्यालयातील सर्व खेळाडूंना ‘ मेजर ध्यानचंद यांच्या जीवन प्रवास व खेळाचे महत्व ‘ या विषयांवर बहुमोल मार्गदर्शन केले व त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका पाथरे यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मो ८२०८१८०५१०