β : सुरगाणा(नाशिक):⇔सुरगाणा तालुक्यात संततधार पावसाने रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने 8 ते 10 तास वाहतूक ठप्प-(प्रतिनिधी:रतन चौधरी)
β : सुरगाणा(नाशिक):⇔सुरगाणा तालुक्यात संततधार पावसाने रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने 8 ते 10 तास वाहतूक ठप्प-(प्रतिनिधी:रतन चौधरी)
“सुरगाणा तालुक्यात संततधार पावसाने रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने 8 ते 10 तास वाहतूक ठप्प”
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 3 मे 2024
β⇔सुरगाणा(नाशिक), दि.3 (प्रतिनिधी : रतन चौधरी ):- सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळपासुनच पावसाने जोर धरल्याने दिवसभर संततधार सुरु होती. यामुळेच रस्त्याच्याकडेला गटारी लगत असलेले लहान – मोठी वृक्ष उन्मळून पडली होती. यामध्ये ‘सुरगाणा ते उंबरठाण’ या गुजरात राज्य महामार्गावर कोठुळा गावाजवळील चिंतामणवाडी येथे शनिवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान बाभळीचे झाड रस्त्यावर मधोमध पडल्याने वाहतूक बंद झाली होती. पर्यायी रस्ता म्हणून तालुक्यात पोहचण्यासाठी कोळुळा, अलंगुण, उंबरविहीर, जामुनमाथा या रस्त्याचा वापर करण्यात आला. वळसा घालून यावे लागत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. तर दुसरीकडे ‘अलंगुण ते पळसन’ या रस्त्यावर सकाळीच हातरुंडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे भले मोठे वडाचे झाड सकाळी दहा वाजेच्या दरम्यान रस्त्यावर पडल्याने आठ ते दहा तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सदर वाहतूक ठप्प झाल्यामुळे सुरगाणा तालुक्यात येणाऱ्या वाहनांनी उंबरदे(प), काशीशेंबा, धुरापाडा, माणी, सुरगाणा या एकेरी रस्त्याचा वापर केला. स्थानिक नागरीकांनी झाडाच्या फांद्या छाटून दिल्याने रस्त्याच्या कडेने दुचाकीस्वारांनी चिखलातून वाट काढत दुचाकी वाहने काढली. या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत कोठुळा गावाजवळील रस्त्यावरील बाभळीचे झाड जेसीबीने हटविण्यात आहे. तर पाच वाजेपर्यंत हातरुंडी गावाजवळील वडाचे झाड हटविण्यात आले. सायंकाळपर्यंत पळसन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरळीत करण्यात आला.
प्रतिक्रिया-“तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडतात. याबाबत नैसर्गिक आपत्ती विभाग, तहसिल कार्यालयाला नागरिकांनी तात्काळ कळविले. वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून दखल घेत जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. पावसाळ्यात जेसीबी चालक (ऑपरेटर) तात्काळ उपलब्ध होत नसल्याने थोडा उशीर होतो.” हेमंत बागुल- शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम सुरगाणा.
प्रतिक्रिया-“सुरगाणा तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग कक्ष स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाचे प्रमुख महसूल सहाय्यक दत्तात्रेय पेंटावाड हे चोवीस तास लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास (०२५९३) २२३६४४ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा– रामजी राठोड, तहसिलदार सुरगाणा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )