आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
सायखेडा विद्यालयात विज्ञान छंद मंडळ स्थापन (प्रतिनिधी : राजेंद्र कदम)
सायखेडा विद्यालयात विज्ञान छंद मंडळ स्थापन ! सायखेडा प्रतिनिधी : राजेंद्र कदम
0
0
8
7
7
9
सायखेडा विद्यालयात विज्ञान छंद मंडळ स्थापन
दिव्य भारत बी एस एम न्यूज :सायखेडा प्रतिनिधी : राजेंद्र कदम
सायखेडा, (ता . निफाड ) ता .१५ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ):- जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी दीपप्रज्वलन व मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री नवनाथ निकम पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ,संशोधक वृत्ती, चिकित्सक विज्ञान विषयक विचार रुजवण्यासाठी शालेय स्तरावर विज्ञान छंद मंडळासारखे उपक्रम हाती घेणे ही काळाची गरज आहे. त्यातूनच बाल वैज्ञानिक देशाला मिळतील, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका श्रीमती संगीता भारस्कर यांनी केले. यावेळी शरद वाणी, संजय चौधरी ,सविता घुले, तेजस्विनी जाधव, श्रीमती मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक श्री शरद वाणी यांनी केले. यात त्यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला . यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमधून कार्यकारणी तयार करण्यात आली .पर्यवेक्षक श्री शिंदे यांनी दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. श्रीमती मोरे यांनी विज्ञानातील जाणिवा यावर विश्लेषण दिले. आभार विज्ञान शिक्षिका सविता घुले यांनी मानले. सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
0
0
8
7
7
9