सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमीला महाराष्ट्र शासनाचा “बेस्ट ट्रस्टी अवॉर्ड” प्रदान
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.8 डिसेंबर, 2023
β⇔ताहाराबाद , ता.8 (प्रतिनिधी : डॉ.भागवत महाले ) :- मुंबई येथे इ.एस.एफ.इ व महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बी.के.सी ग्राउंडवर झालेल्या एका कायर्क्रमात सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी,करंजाड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेस उत्कृष्ट गुणवत्ता व उत्कृष्ट व्यवस्थापन अंतर्गत “स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२३”अंतर्गत “बेस्ट ट्रस्टीज अवॉर्ड”नुकताच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे संस्थापक डॉ.प्रसाद दादा सोनवणे, जनरल सेक्रेटरी डॉ.सौ.मेघनाताई सोनवणे व मॅनेजिंग ट्रस्टी अमर दादा रोहमारे यांनी हा सन्मान स्वीकारला आहे. सदर सन्मान संस्थापक अध्यक्ष स्व.कर्मवीर डॉ. प्रभाकर नाना सोनवणे, स्व. सौ.सुशीला ताई यांच्या चरणी अर्पण करण्यात आला. तसेच याचे सर्व श्रेय ट्रस्टीजवर विश्वास असलेल्या पालक, विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक व संस्थेवर प्रेम करणाऱ्या हितचिंतक यांना देण्यात आले. असा सन्मान प्राप्त करणारी जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील एकमेव शाळा आहे.आजपर्यंत शाळेने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळवलेले आहे.शाळेच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले : मो.८२०८१८०५१०
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा