





नाशिक येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथ.विभाग
राज्य कार्यकारिणी सभा संपन्न, राज्य सरचिटणीस – कार्यवाहपदी- संजय पगार यांची निवड

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 4 फेब्रुवारी 2024
β⇔ दिंडोरी, दि.4 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी सभा पार पडली. या सभेमध्ये प्रास्ताविक नाशिक जिल्हा नेते रमेश गोहिल यांनी केले. प्रारंभीचे मनोगत रावसाहेब जाधव यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक परिषदेचे संस्थापक कोषाध्यक्ष संजय पगार, कार्याध्यक्ष बाबुराव पवार कार्याध्यक्ष भरत मडके, कार्यकारी अध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्यकारी अध्यक्ष बाबुराव गाडेकर, राज्य सल्लागार सुधाकर मस्के, संपर्कप्रमुख राजेंद्र नांद्रे, सह -संपर्कप्रमुख दिलीप पाटील, मंगेश जैवाल ,सचिन काठोळे, राजेंद्र शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक सोसायटी चेअरमन चंद्रकांत लहांगे, संचालक अरविंद माळी, मीना लोहकरे, अनिता मुतडक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील उल्लेखनीय कामामुळे महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे नेते संजय बबनराव पगार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्था नवनिर्वाचित संचालक पंकजकुमार गवळी, दादाजी अहिरे, प्रवीण गरुड, योगेश बच्छाव,शांताराम आजगे, दिपाली थोरात-पवार , उषा दुगाणे – बादाड,श्रावण भोये, गीतांजली भोये, युवराज भरसट ,कौशल्या गायकवाड , जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष दुर्वादास गायकवाड यांचा पदाधिकारी म्हणून तर प्रकाश पवार, छबिलाल कोळी, हरिचंद्र गावीत, नंदू महाले यांचा लढवय्ये म्हणून सत्कार करण्यात आला व सर्वांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
निवड श्रेणीमध्ये काम करणाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. अनिल दराडे (जि प नाशिक ओस.एस.), श्रीमती चारुशीला भोसले, कनिष्ठ लिपिक -सखाराम सोनवणे,दीपक अहिरे,प्रवीण कोळी आदींचा सत्कार करण्यात आला.
नवीन प्रवेश दिंडोरी- कैलास पाटोळे जिल्हा प्रतिनिधी,प्रवीण दळवी- देशमुख यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, रवींद्र भरसट – दिंडोरी तालुका कार्याध्यक्ष, सुरेश सातपुते,कैलास बांगर – दिंडोरी संघटक,सुधाकर पाटील,भरत कडाळे,अरुण इंगळे,नरहरी वाघमारे-निफाड, प्रभाकर नेरकर, रवींद्र कुर्हाडे- चांदवड, चिंतामण मोहन- कळवण,संदिप गुंजाळ-नाशिक , उल्हास जाधव,
प्रवीण जाधव-त्र्यंबकेश्वर,संतोष शार्दुल,चेन्नया स्वामी,अनिल खैरनार,नारायण गावित-पेठ,आदी पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात तर जालना, धुळे, नंदुरबार, ठाणे जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये निवडून आलेली संचालक मंडळ चेअरमन यांचाही सत्कार करण्यात आला.
राजेंद्र नांद्रे,बाबुराव गाडेकर व साधनाताई जैवाल यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक परिषद राज्य कार्यकारिणीने एकमताने संजय बबनराव पगार संस्थापक राज्य कोषाध्यक्ष यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग राज्य सरचिटणीसपदी निवड केली व त्या निवडी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.राज्य स्तरावरील जिल्हास्तरावरील शिक्षक समस्या वर सविस्तर चर्चा झाली. जुनी पेन्शन साठीचे राज्यस्तरावरील प्रयत्न लढा दिशा राज्याध्यक्षांनी स्पष्ट केली, शैक्षणिक कामांचा बोजवारा कमी करण्यासाठीच्या उपाययोजनावर चर्चा झाली.
सामान्य शिक्षकांचे प्रश्न योग्य प्रकारे सोडवले तर शिक्षक हा आपल्या पाठीशी उभा राहतो, असे राज्याध्यक्ष राजेश सर यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील निवड श्रेणी प्रश्न सुटतात . पदोन्नती लढा हाती येत आहोत, असे संजय पगार यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा नेते रमेश गोहिल, जिल्हा कार्यवाह राजेंद्र खैरनार, कार्याध्यक्ष -जितेंद्र खोर, शांताराम कापसे यांचा सत्कार झाला.श्रीमती दर्शना चव्हाण-पगार, श्रीमती देवकर ,श्रीमती कोळी,उत्कर्ष कोंडावार ,किरण पाटील, यशवंत भामरे,रवींद्र ह्याळिज, सुभाष बर्डे, नितीन शिंदे, राजेंद्र कापसे,बहिरम,धनंजय क्षत्रिय,प्रविण सोनवणे ,सुरेश सातपुते, राहुल परदेशी,श्रीकांत बिरादार, नागनाथ गोंड, सुनील कराड, देवानंद वाघमारे, भरत कडाळे, प्रभाकर नेरकर, राजेंद्र पवार, मिलिंद धिवरे,प्रमोद देवरे, संजय देवरे, दीपक वसावे, विश्वास आहेर दादा इथापे,नवनाथ गोंड,सुदाम बोडके,नरहरी वाघमारे , प्रकाश पाटील, महेश सोनवणे,शरद बर्मे,संजय सोनवणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष कोंडावर यांनी तर आभार रावसाहेब जाधव यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510