β⇒ नाशिक : राज्यशास्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भागवत महाले यांच्या संपादित “समकालीन राजकीय चळवळी” या पुस्तकाचे प्रकाशन – ( खास प्रतिनिधी : शाश्वत महाले )
राज्यशास्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भागवत महाले यांच्या संपादित “समकालीन राजकीय चळवळी” या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी व चित्रपट गीतकार प्रा. प्रकाश होळकर,
राज्यशास्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भागवत महाले यांच्या संपादित “समकालीन राजकीय चळवळी” या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी व चित्रपट गीतकार प्रा. प्रकाश होळकर,
दिव्य भारत बी.एस .एम. न्यूज वृत्तसेवा :
नाशिक, ता.३० ( दिव्य भारत बी.एस .एम. न्यूज वृत्तसेवा ):– मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात आज विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या समारंभास प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून सुप्रसिद्ध कवी व चित्रपट गीतकार प्रा. प्रकाश होळकर, लासलगाव( नाशिक) हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी व प्राचार्य डॉ. भास्कर ढोके, उपप्राचार्य डॉ. शरद कांबळे, सकाळ सत्र प्रमुख प्रा. राजेश झनकर, कार्यक्रमाचे स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. प्रशांत रणसुरे, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भागवत महाले, प्रा. नीता पुणतांबेकर, प्रा. उत्तम सांगळे, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यशास्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भागवत महाले यांच्या संपादित “समकालीन राजकीय चळवळी” या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी व चित्रपट गीतकार प्रा. प्रकाश होळकर, प्रमुख अतिथी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य व मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ढोके म्हणाले की ग्रंथ म्हणजे बुद्धी व विचाराचे प्रतिबिंब असते. त्यात समाजातील घटकांचा विधायक व विघातक परिणाम दृष्टीक्षेपात पडतो. अशा प्रकारचे ग्रंथ प्रकटीकरण समाजात होणे अत्यावश्यक आहे, तरच समाजामध्ये योग्य प्रबोधन होऊन समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा, राजकीय नीती, व्यवहार हे दूर करण्यासाठी ग्रंथांचा मोठा वाटा आहे, असे याप्रसंगी बोलतांना सांगितले. आपल्या महाविद्यालयात ग्रामीण व आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी जास्त आहेत. हे विद्यार्थी खूप कष्टाळू व प्रामाणिकपणे काम करताना दिसतात, त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमच्या महाविद्यालयात विविध संशोधन व कार्य हाती घेण्यात आलेले आहेत. आमचे प्राध्यापक वर्ग नेहमी संशोधनामध्ये व इतर सर्व गोष्टींमध्ये एकमेकांना सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल असल्याचे दिसून येते असे सांगितले.
प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डॉ. भागवत महाले यांनी संपादित केलेले समकालीन राजकीय चळवळी या पुस्तकाचे प्रकाशन करतांना अभिमान वाटतो आहे, असे त्यांनी भावना व्यक्त करतांना सांगितले. ते पुढे बोलतांना म्हणाले की, अशा प्रकारच्या ग्रंथांचं प्रकटीकरण समाजात होणं अत्यावश्यक आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सरस्वती देवीचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ढोके यांच्या हस्ते पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रा.डॉ भागवत महाले यांच्या समकालीन राजकीय चळवळी या पुस्तकाचे प्रकाशन करून विद्यार्थानाचे बक्षीस वितरण करण्यात आले त्यादरम्यान पिश पाण्ड (सेला पागोटा) कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक प्रा. प्रशांत रणसुरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. राजेश झनकर, प्रा. उत्तम सांगळे, डॉ दिनेश उकिर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. नीता पुणतांबेकर यांनी केले. यावेळी ४०० अधिक विद्यार्थी उपस्थित होते, सदर कार्यक्रमास प्राध्यापक, प्राध्याकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
- दिव्य भारत बी.एस .एम. न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक @ डॉ.भागवत महाले मोब.-८२०८१८०५१०