β : वणी(नाशिक) :⇔’दिंडोरी-पेठ’ विधानसभा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष रेहरे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात-(प्रतिनिधी : सुरेश सुराशे)
β : वणी(नाशिक) :⇔'दिंडोरी-पेठ' विधानसभा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष रेहरे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात-(प्रतिनिधी : सुरेश सुराशे)
‘दिंडोरी-पेठ’ विधानसभा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष रेहरे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 27 ऑक्टोबर 2024
β⇔वणी(नाशिक), ता.27 (प्रतिनिधी : सुरेश सुराशे):-महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार संतोष रेहरे यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला असून त्यामुळे दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
महायुतीत माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आ. नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अर्ज दाखल करून प्रचारात उतरले आहेत. त्याचबरोबर, महाविकास आघाडीतही संतोष रेहरे आणि सुनीता चारोस्कर या दोघांनी पूर्वीपासून मतदारसंघात प्रचार चालवला होता. मात्र, अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर चारोस्कर यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडले गेले, त्यामुळे संतोष रेहरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला.
दिंडोरी, कोचरगाव, मोहाडी, खेडगाव, उमराळे, वणी, आणि अहिवंतवाडी भागातील कार्यकर्त्यांनी संतोष रेहरे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मागणी केली आहे. संतोष रेहरे यांच्यावर लोकांचे प्रेम असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर संतोष रेहरे यांच्या अपक्ष उमेदवारीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, आणि त्यांच्यावरील पाठिंबा वाढत चालला आहे.
धनराज महाले यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आ. नरहरी झिरवाळ यांच्यासमोर आव्हान उभे राहणार आहे, तर महाविकास आघाडीच्या सुनीता चारोस्कर यांना संतोष रेहरे यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. निवडणुकीतील नेमके चित्र उमेदवारांच्या माघारीनंतरच स्पष्ट होईल.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510