





डॉ. भागवत महाले यांना प्रतिष्ठा न्यूज सांगलीचा राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान
लीना महाले -प्रतिनिधी नाशिक
सांगली , ता. २४ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- सकारात्मक दृष्टिकोण ठेवून माध्यमांनी सामाजिक प्रश्न सोडवण्याचा सदैव प्रयत्न करावा आणि आपल्या कार्यातून जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन सांगली मिरज, कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी प्रतिष्ठा न्यूजवृत्तसेवा संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करतांना सांगली येथील डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे बोलताना केले. यावेळी प्राचार्य डॉ. डी. जी कणसे ( पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली) , प्रतिष्ठा न्यूज संपादक तानाजीराजे जाधव , उपसंपादक योगेश रोकडे, व्यवस्थापक विद्या जाधव, प्रा डॉ प्रतिभा पैलवान, उद्योजक दिनेश पवार, अधिव्याख्याता प्रा. सुभाष बुवा, वैशाली महाले आदी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सांगली मिरज, कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक . येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख (सहयोगी प्राध्यापक )
डॉ. भागवत शंकर महाले यांचा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन कार्य करत आपले उत्तम सेवा देत आहेत, नुकतेच त्यांना सामाजिक शास्त्रातील संशोधन पेटंट राज्यशास्त्र विषयात मिळाले आहे. त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रश्न , समस्या सोडविण्यासाठी सदैव मदत करत आहेत. त्यांना अगोदर पुणे विद्यापीठचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, ग्लोबल इंडिया ॲचिव्हर्स गोल्ड मेडल पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, उत्कृष्ट संशोधन पेपर आदीसह अनेक कार्यात सहभागी होत उत्तम काम करत असल्याने त्याबद्दल त्यांच्या कार्याची दाखल घेत प्रतिष्ठा न्यूज सांगलीतर्फे प्रशस्तीपत्र व सन्माचिन्ह देवून सांगली मिरज, कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार व पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस मा. ॲड नितीनजी ठाकरे, अध्यक्ष मा. सुनील ढिकले, उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे , सभापती – मा. बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती मा. देवराम मोगल, चिटणीस मा. दिलीप दळवी, त्र्यंबकेश्र्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भास्कर ढोके, शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव, शिक्षणाधिकारी डॉ ज्ञानेश्वर लोखंडे, शिक्षणाधिकारी डॉ. विलास देशमुख, प्राचार्य डॉ हनुमंत थोरात, खेड महाविद्यालय (रत्नागिरी), उपप्राचार्य डॉ शरद कांबळे, प्रा.संदीप निकम, प्रा. राजेश झनकर, प्रा. योगेश मोहन, प्रा.सुभाष बुवा, प्रा सुरेश भोये, शंकर महाले, वैशाली महाले, राम वणवे, मनजीतशील कोंडे-देशमुख, बापू देशमुख उत्तम पवार , राजेश भोये, आदीसह नाशिक जिल्ह्यातून अभिनंदन केले आहे.