





भगिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तत्पर… : सहाय्यक पोलीस निरीक्षक- श्री. विकास ढोकरे

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 19 ऑगस्ट 2024
β⇔सायखेडा (नाशिक), दि.19 (प्रतिनिधी :राजेंद्र कदम):-कोणताही सण असो पोलीस कर्तव्यावर हजर राहून माता भगिनींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहतात, समाजामध्ये शांतता राखावी म्हणून पोलीस दल अहोरात्र मेहनत घेत असतात. पोलीस हा भाऊ आपल्या सावली सारखा पाठीशी असेल म्हणून सर्वांनी टोल फ्री क्रमांक 112 आपणास कुठले अडचण असल्यास फोन करावा तसेच सायबर क्राईम सारखे गुन्ह्यांसाठी 1930 नंबर वर कॉल करावा. रक्षाबंधनाच्या दिवशी यासारखी वेगळे भेट दुसरी कोणतीच असू शकत नाही, असे प्रतिपादन सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विकास ढोकरे यांनी केले. ते जनता इंग्लिश स्कूल तुळजाभवानी नवरात्र फेस्टिवल व सायखेडा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जगन आप्पा कुटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई खर्डे, विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ निकम, ग्रामपालिकेचे सदस्य अश्फाक शेख, हसीना शेख, पर्यवेक्षक राम ढोली, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे, विमल पवार, मंगला जोंधळे, मंगला पवार, गुड्डी प्रजापति, सोनम नवले, हिरा राजस्थानी, सिंधू पवार, सोनाली ढोकळे, पूर्वा रामा कुटे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळजाभवानी नवरात्र फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष व ग्रामपालिकेचे सदस्य अशपाक शेख यांनी केले. यावेळी सायखेडा पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस भाऊंना उपस्थित महिला व एनसीसीच्या विद्यार्थिनींनी राख्या बांधून भावाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी यावेळी गावातील विविध समस्या व त्यावर उपाय याबाबत चर्चा केली. त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ढोकरे साहेबांनी आपल्या सर्व समस्यांवर उपाय सुचवून महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलले जातील अशा आश्वासन दिले. या कार्यक्रमास बहुसंख्य महिला शालेय विद्यार्थिनी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )