स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: नाशिक : सोमवार : दि . 21 ऑगस्ट 2023
β⇒ धुळे ( प्रतिनिधी : भागवत सोनवणे ) :- देवपूर येथील श्री. एकविरा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष – प्रशांत वाघ व सचिव – प्रदीप वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका श्रीमती पी आर अहिरराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावरून मुख्याध्यापिका श्रीमती पी आर अहिरराव ,ज्येष्ठ शिक्षक आर एन घोडके , जी बी फुलपगारे , एन एन पाटील व पी बी पाटील यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद,शिक्षकेतर कर्मचारी बंधू व सर्व विद्यार्थ्यांनी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेतली.
एन एन पाटील यांनी राजीव गांधी हे पारदर्शी,अतिशय मनमिळावू,प्रेमळ व धाडसी होते. चांगली भावना,चांगले विचार म्हणजे सद्भावना होय, असे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. श्रीमती पी आर.अहिरराव यांनी राजीव गांधी यांनी भारताचे अधुनिकरण,विज्ञान व तंत्रज्ञानात , कॉम्पुटर व दूरसंचार यावर भर दिला . व्हिजन 2020 कार्यक्रम सुरू केला व वयाच्या चाळीसाव्या वर्षी सर्वात तरुण भारतीय पंतप्रधान झाले असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले. पी बी पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले . आभार प्रदर्शन एन एन पाटील यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक ,शिक्षिका , शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०