सुरगाणा तालुक्यात बा-हे परीसरात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान,नुकसान भरपाई मागणी
β⇔ सुरगाणा (ग्रामीण), दि.16 (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार):-सुरगाणा तालुक्यातील बा-हे ते ननाशी रस्त्यावर वादळाने झाड़े उमळून पडल्याने रस्ता बंद झाला.सुरगाणा तालुक्यातील बा-हे परिसरातील अंबूपाडा,बेडसे,ठाणगाव,खोकरर्विहीर, झगडपाडा, जाहुले हस्ते, सायळपाडा, वांगणपाडा, कोडीपाडा,गुरुटेंभी ,भेगु, सावरपाडा, कळमणे, खिरमाणी, मोधळपाडा, हस्ते जिल्हा परिषद शाळेचे उडाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. या गावांना सोमवारी दुपारी तीन – सव्यावातीन वाजाच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह अवकाळी पावसाने एक ते दीड तास हजेरी लावली. या वादळी वा-याने परिसरातील गावातील नागरिकांच्या घरांचे पत्रे, कौले उडाले असून छपर ही कोसळले आहेत. तर बहुतांश घरांसह आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झगडपाडा येथील चिंतामण त्र्यंबक घांगळे यांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. तुळशीराम जाधव , युवराज घांगळे,हिरामण महाले यांच्या घरांचे कौले उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे बहुसंख्येने कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. बा-हे परिसरातील संर्पूण गाव पाऊस व वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतकरी कुटुबांना उघडयावर येण्याची वेळ आलेली आहे. सर्व संसार उपयोगी साहित्य , धान्य ,शेतकरी कुटुबांची आंबे फळाचे लाखों रुपयाची नुकसान झाल्यामुळे शेतक-याचे जीवन मातीमोल झालेलं आहे. तरी घराचे, साहित्य , धान्य , आंबे फळाचे लाखों रुपयाचे नुकसान झालेले असून कुटुबांना तत्काळ तलाठी, ग्रामसेवक यानी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. हस्ते येथिल जिल्हा प्रशिद शाळेचे मोठया प्रमानात नुकसान झालेले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510