





बांधकाम कामगारांची लूट, बोगस नोंदणीबाबतचे सिटुचे कामगार उपायुक्त कार्यालयात निवेदन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 17 मार्च 2024
β⇔सुरगाणा (ग्रामीण), दि.17 (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ):- महाराष्ट्र शासन बांधकाम कामगारांसाठी बांधकाम मंडळाकडून गृहउपयोगी भांडे,अन्य योजना मंजूर झाले आहेत. सीटु प्रणित महाराष्ट्र बांधकाम उद्योग, कामगार संघटना ही बांधकाम मजुरांची संघटनेकडे नोंदणी करून घेत असते, म्हणून संघटनेचे फी भरून भांडे व अन्य लाभ मिळणे कामी फार्म भरून देत आहे. नाशिक शहरात व सातपूर विभागात काही ठिकाणी असे निदर्शनास आले आहे, की नोंदणीकृत नसलेल्या संघटना,व्यक्ती व बांधकाम कामगारांची काही माहिती नसलेले एजंट हे बांधकाम कामगारांकडून सातशे रुपये,एक हजार व दीड हजार रुपये घेत्तात आणि तो बांधकाम कामगार नसला, तरी त्याचे फॉर्म भरून कामगार आयुक्त कार्यालयामध्ये दाखल करून त्यांना भांडे मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खरे बांधकाम लाभार्थी हे वंचित राहणार असून ज्यांचा बांधकाम कामाशी काही एक संबंध नाही अश्या लोकांची नोंदणी करून शासनाची व बांधकाम कल्याण मंडळाची फसवणूक करीत आहे.
आपल्या कार्यालयातील देखील काही अधिकारी बोगस एजंटची संगमत करून बोगस लोकांची नोंदणी करून त्यांना ते भांडी देत आहे. सातपूर येथील एका किराणा दुकानांमध्ये ही बोगस नोंदणी सुरू असून त्यांच्याकडून ७००/- रुपये घेऊन फार्म भरून घेतले जातात. त्या दुकानाचे नाव लड्डू गोपाल किराणा अँड जनरल स्टोअर व त्यांचे मालक संजय चव्हाण असे असून आपण त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून बोगस नोंदणी बंद करून शासनाची होणारी फसवणूक थांबवावी व खऱ्या बांधकाम कामगारांना या योजनेचा फायदा मिळावा, यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या अधिकारी शर्वरी पोटे यांना सिटुचे जिल्हा सरचिटणीस कॉ देविदास आडोळे, कॉ. भिवाजी भावले, कॉ. अरविंद शहापुरे, कॉ. संतोष कुलकर्णी, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. हिरामण तेलोरे यांनी मागणीचे निवेदन दिले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510